मोशीतील बाजारात कोथिंबीर, मेथी, शेपू पालेभाज्यांची मोठी आवक 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 December 2020

44 हजार 550 जुड्या, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, ढोबळी, कारली आदी फळभाज्यांचीही मागील आठवड्यापेक्षा 2 हजार 500  क्विंटल जास्त तर पपई, केळी, अननस, कलिंगड, खरबूज आदी फळांची 330 क्विंटल एवढी आवक झाली. 
 

मोशी : पुणे जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांमध्ये शेतीमालाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू आहे. रविवारी (ता. 27) मोशीतील श्री नागेश्वर महाराज उपबाजार समितीमध्ये कोथिंबीर, मेथी, पालक आदी पालेभाज्यांची मागील आठवड्यापेक्षा काही प्रमाणात जास्त आवक झाली.
 

44 हजार 550 जुड्या, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, ढोबळी, कारली आदी फळभाज्यांचीही मागील आठवड्यापेक्षा 2 हजार 500  क्विंटल जास्त तर पपई, केळी, अननस, कलिंगड, खरबूज आदी फळांची 330 क्विंटल एवढी आवक झाली. 

शेतीमालातील बीन्स, दोडका, शेवगा आदी फळभाज्यांच्या भावात वाढ झाली आहे तर कोबी, फ्लॉवर, टोमॅटो भाव कमी झाले आहे. पालेभाज्यांची मोठी आवक झाल्याने कोथिंबीर, मेथी आदी भाज्यांचे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत. मात्र अन्य पालेभाज्यांचे भाव स्थिर आहेत. सफरचंद, किवी, शहाळे आदी फळे फळांचे भावही स्थिर आहेत.

फळभाज्या आवक : 2 हजार 500 (बाजारभाव 1 किलोचे)

कांदा नवीन : 10 ते 20
कांदा जुना : 15 ते 25
बटाटा नवीन : 10 ते 20
बटाटा जुना : 15 ते 20
लसून : 70 ते 100
आले : 20 ते 40
भेंडी : 20 ते 35
दिल्ली : 30 ते 40
महाबळेश्वर : 35 ते 40
गवार : 30 ते 40
टोमॅटो : 20 ते 25
मटार : 30 ते 40
घेवडा : 30 ते 40
बीन्स : 60 ते 70
दोडका : 40 ते 50
मिरची लवंगी : 40 ते 45
मिरची साधी : 30 ते 40
ढोबळी : 20 ते 30
दुधी भोपळा : 10 ते 15
डांगर भोपळा : 8 ते 10
भुईमूग शेंग : 50 ते 60
काकडी : 12 ते 15
कारली हिरवी : 15 ते 20
कारले पांढरे : 14 ते 18
 पडवळ : 30 ते 40
पापडी : 30 ते 40
फ्लॉवर : 4 ते 8 
कोबी : 4 ते 8
वांगे हिरवे : 15 ते 20
वागे बंगाळे : 18 ते 25
वांगे भरताचे : 20 ते 22
सुरण : 30 ते 40
तोंडली लहान : 20 ते 22
तोंडली जाड : 15 ते 20
बीट : 10 ते 12
कोहळा : 20 ते 22
पावटा : 25 ते 35
वाल : 25 ते 35 
वालवर : 22 ते 30
शेवगा : 70 ते 80
ढेमसे : 30 ते 40
नवलकोल : 30 ते 40
डबल बी : 30 ते 40
डिंगरी : 20 ते 30

पालेभाज्या आवक : 44 हजार 790 जुड्या (भाव एका जुडीचे)कोथिंबीर गावरान : 4 ते 5 
कोथिंबीर साधी : 3 ते 5
मेथी : 5 ते 8
शेपू : 5 ते 8
कांदापात : 10 ते 12 
पालक : 5 ते 8
मुळा : 5 ते 8
चवळी : 5 ते 8
चाकवत : 5 ते 8
चुका : 5 ते 8
अंबाडी : 5 ते 8
राजगिरा : 5 ते 8
हरभरा : 5 ते 
कढीपत्ता : ते 8
माठ : 8 ते 10
पुदिना : 5 ते 6
नारळ : 25 ते 30
मका कणीस : 6 ते 8
लिंबू : 60 ते 70

फळे आवक : 365 क्विंटल (भाव एक किलोचे/नगाचे)
सफरचंद  काश्मिरी : 180 ते 200
सफरचंद  शिमला : 180 ते 210
पपई : 10 ते 15 
केळी : 30 ते 40 रु. डझन
मोसंबी : 60 ते 80
संत्री : 50 ते 70
डाळिंब : 70 ते 90
बोर : 50 ते 80 
शहाळे : 25 ते 40 रु. नग
पेरू : 40 ते 50 
चिकू : 50 ते 60
कलिंगड : 15 ते 20 कि. 
खरबूज : 20 ते 25 
अननस : 40 ते 60
किवी : 70 ते 80
चिंच : 40 ते 50


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Large inward of leafy vegetables like cilantro, fenugreek shepu in Moshi market