मावळात आज २१ नवे पॉझिटिव्ह, तर 'एवढ्या' रुग्णांची कोरोनावर मात

मावळात आज २१ नवे पॉझिटिव्ह, तर 'एवढ्या' रुग्णांची कोरोनावर मात

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात सोमवारी दिवसभरात २१ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले, तर दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तालुक्यातील मृतांची संख्या २७ झाली असून, रुग्ण संख्या ८२९ वर पोचली आहे. मात्र, त्यातील निम्म्या म्हणजे ४१४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तळेगाव येथील ७३ वर्षीय महिला व सोमाटणे येथील ५५ वर्षीय पुरुषाचा मृतांमध्ये समावेश आहे. त्यांना इतरही काही आजार होते. सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या २१ जणांमध्ये तळेगाव दाभाडे येथील सर्वाधिक नऊ, देवघर येथील दोन; तर लोणावळा, परंदवडी, वराळे, कुसगाव बुद्रुक, कान्हे, ब्राम्हणवाडी, साते, सावंतवाडी, साळूंब्रे व काले येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ८२९ झाली असून, त्यात शहरी भागातील ३८५, तर ग्रामीण भागातील ४४४ जणांचा समावेश आहे. तळेगावात सर्वाधिक २६९, लोणावळा येथे ६६, तर वडगाव येथील रुग्ण संख्या ५० झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. ४१४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारी ४४ जणांना घरी सोडण्यात आले. तालुक्यात सध्या ३८८ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील २३१ लक्षणे असलेले व १५७ लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या २३१ जणांमध्ये १७५ जणांमध्ये सौम्य, तर ४७ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. आठ जण गंभीर, तर एक जण अत्यवस्थ आहे. २०७ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरू असून, १८१ जण गृहविलगीकरणात असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com