Breaking : पिंपरी-चिंचवडकरांनो पाणीपुरवठ्याबाबत महत्त्वाची बातमी

Breaking : पिंपरी-चिंचवडकरांनो पाणीपुरवठ्याबाबत महत्त्वाची बातमी

पिंपरी : महावितरणचे फीडर मंगळवारी (ता. 2) सायंकाळी नादुरुस्त झाले. त्यामुळे महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. परिणामी संपूर्ण पंपिंग बंद झाले आहे. त्यामुळे शहरातील आज (मंगळवार) सायंकाळचा आणि उद्या (बुधवार) सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत होईल. महावितरण मार्फत दुरुस्तीचे काम सुरू आहे. विद्युत पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल, असे महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या सहशहर अभियंत्यांनी कळविले आहे. 

पवना नदीवरील रावेत बंधाऱ्याजवळ महापालिकेचे अशुद्ध जलउपसा केंद्र आहे. 20 पंपांद्वारे येथून दररोज सुमारे 510 दशलक्ष लिटर अशुद्ध पाणी उचलले जाते. तेथून पाइपद्वारे निगडी- प्राधिकरणातील सेक्‍टर 23 मधील जलशुद्धीकरण केंद्रात पाठविले जाते. त्यानंतर शहरातील टाक्‍यांमध्ये वितरीत करून त्या-त्या भागात पाणीपुरवठा केला जातो. अशी महापालिकेची पाणीपुरवठा यंत्रणा आहे. शिवाय, एमआयडीसीकडून 30 दशलक्ष लिटर पाणी विकत घेतले जाते. दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, नाशिक फाटा व एमआयडीसी परिसरातील निवासी क्षेत्रात हा पाणीपुरवठा केला जातो. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, रावेत अशुद्ध जलउपसा केंद्राला वीज पुरवठा करणारे महावितरणच्या फिडरमध्येच मंगळवारी सायंकाळी बिघाड झाला. त्यामुळे अशुद्ध जलउपसा केंद्रातील सर्व पंप बंद पडले. परिणामी, निगडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोचण्यास अडचण निर्माण झाली आहे. तसेच, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने फिडर दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. ते दुरुस्त झाल्यानंतर अशुद्ध जलउपसा सुरू होईल. मात्र, आज सायंकाळपासून जलउपसा बंद झाल्याने शहरात सायंकाळी होणारा व बुधवारी सकाळी होणारा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे, असे पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com