लोणावळा- पुणे लोकल सुरू करा; पाहा कोणी केली 'अशी' मागणी

Lonavla-Pune local start demand Maval MP Shrirang Barne to Railway Minister Piyush Goyal
Lonavla-Pune local start demand Maval MP Shrirang Barne to Railway Minister Piyush Goyal

पिंपरी : कोरोना व लॉकडाऊनमुळे लोणावळा- पुणे लोकल रेल्वे सेवा गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून पुणे, पिंपरी-चिंचवड शहर व जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल झाल्याने सर्व कार्यालये, कंपन्या, दुकाने सुरू झाली आहेत. सरकारी कार्यालयेही पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. मात्र, अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना लोकल सेवा बंद असल्याने प्रवासात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांना कार्यालयात जाण्यासाठी विलंब होत आहे. त्याकरिता मुंबईप्रमाणेच पुणे, पिंपरी-चिंचवड, मावळातून धावणारी पुणे-लोणावळा लोकल सेवा सरकारी कर्मचाऱ्यांकरीता सुरू करावी, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. 

पुण्यात लर्निंग लायसन्स टेस्ट आता सकाळी साडेसात पासूनच 

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन खासदार बारणे यांनी निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, कोरोनामुळे मार्च महिन्यापासून देशातील सर्व रेल्वेसेवा बंद केली होती. राजधानी, एक्‍स्प्रेस रेल्वे, माल वाहतूक करणाऱ्या रेल्वे बंद केल्या होत्या. सध्या देशभरात काही विशेष रेल्वे सुरू आहेत. मुंबईत सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाण्यासाठी लोकल रेल्वे सेवा सुरू केली आहे. 

मावळ लोकसभा मतदारसंघात लोणावळा ते पुणे लोकल रेल्वे सेवा सुरू होती. पण, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊमुळे मागील सहा महिन्यापासून लोकल सेवा बंद आहे. परंतु, अनेक सरकारी कर्मचारी लोकल रेल्वे सेवेने प्रवास करत होते. रेल्वे बंद झाल्याने सरकारी कर्मचारी वेळेत कार्यालयात पोहचू शकत नाहीत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कार्यालयात जाण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लोणावळा पुणे ते लोणावळा दरम्यान धावणारी लोकल रेल्वे सेवा सुरू करावी. जेणेकरून सरकारी कर्मचारी कार्यालयात वेळेवर पोहचतील. जनतेची कामे आणि देशाची सेवा करतील, असे खासदार बारणे यांनी निवेदनात म्हटले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com