मुळशीतील 'हा' भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर

मुळशीतील 'हा' भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर

हिंजवडी : जांबे (ता. मुळशी) येथील लाईफ रिपब्लिक सोसायटी व माणमधील मेगा पोलिस सोसायटीची एक इमारत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला असल्याची माहिती मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी दिली. 

माणच्या मेगा पोलिस टाऊनशिपमधील एका इमारतीत वास्तव्यास असलेल्या महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला होता. मात्र, तिच्या संपर्कात आलेल्या इतर सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने माणवासीयांची चिंता कमी झाली. तर जांबे येथील लाईफ रिपब्लिकमध्ये राहणाऱ्या एका नागरिकाला कोरोनाची लागण झाल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या अन्य पाच जणांचे अहवालही पॉझिटिव्ह आल्याने येथील रहिवाशी धास्तावले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परिणामी, आयटीयन्सची चिंता वाढली. या भागात अधिक फैलाव होऊ नये, म्हणून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जांबे व माणच्या या सोसायट्याचा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. पुढील पंधरा दिवस या सोसायट्यामधील रहिवाशांना बाहेर पडता येणार नाही व विनापरवाना आत कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. फक्त दूध व भाज्या सोसायटीच्या आवारात पुरविल्या जातील, असेही चव्हाण यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, या सोसायट्यामध्ये सापडलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व कुटुंबाचा सर्वे करून काही व्यक्तींना होम क्वारंटाईन केले असून, आरोग्य विभाग त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहे, असे मुळशीचे गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी सांगितले.

ते म्हणाले, जांबे येथील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या पाच जणांना देखील कोरोनाची लागण झाल्याने संसर्ग अधिक वाढू नये, म्हणून प्रशासन या भागावर अधिक लक्ष देऊन आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com