Video : मावळातील आंबा उत्पादकांसमोर हे संकट...

Video : मावळातील आंबा उत्पादकांसमोर हे संकट...

कामशेत : मावळ तालुक्यात पाचशे हेक्टरवर केशर आंब्याची लागवड आहे. मात्र, या वर्षी केशर बहरला नाही. परिणामी शेतकऱ्यांना यंदा या आंब्यापासून उत्पन्न मिळाले नाही. काही बागेतील आंब्यांना मोहोर आला, त्या बागेतील आंबा बाजारात भाव खाऊन गेला आहे. 

आंबा हे वर्षांआड बहरणारे पीक असल्याने यंदा आंबा बहरला नसला, तरी पुढच्या वर्षी मावळातील केशरची चव देश-परदेशात पोचेल. 
या वर्षीच्या हंगामात बहुतेक आंब्याला मोहोर आला नाही. त्यामुळे आंबा येऊन त्याची गळती झाली नसल्याने त्याची नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांना करता येत नाहीत. निसर्गाच्या नियमाने यावर्षी जरी आंबा बहरला नसला, तरी मागच्या वर्षी आंब्याचे पीक जोमात होते. मागच्या वर्षी किफायतशीर ठरलेली आंबा यंदा मात्र तोट्यात आहे. पण, त्याचा पुढच्या वर्षी नफा येईल म्हणून आंबा उत्पादक बागेतील आंब्याला खते, औषधे, पाणी देत असून, मशागत करीत आहेत. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पाचशे हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे साडेसहा हेक्टर आंब्याचे नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाच्या दप्तरी आहे. आंबा उत्पादक शामसुंदर अग्निहोत्री म्हणाले, "मागील परदेशात आंब्याची निर्यात केली होती. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी पंचाहत्तर टक्के उत्पादनात घट झाली आहे. सध्या पंचाहत्तर रुपये प्रतिकिलो दराने आंब्याची जागेवरच विक्री सुरू आहे. काही प्रमाणात दुबईत निर्यात केली आहे." तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे म्हणाले, "आंबा वर्षांआड येणारे पीक आहे. यावर्षी झाडाला फळे लागली नाहीत, तर शेतकऱ्यांचे नुकसान झाले, असे म्हणता येणार नाही. अल्प प्रमाणात झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले आहे." 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com