सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Suicide
Suicide

पिंपरी - घर बांधण्यासाठी माहेराहून पैसे आणण्याचा तगादा लावत सासरच्यांनी विवाहितेचा छळ केला. या छळाला कंटाळून विवाहितेने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पिंपळे गुरव येथे उघडकीस आली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अभिजित गुंडू गायकवाड, गुंडू शंकर गायकवाड, शारदा गुंडू गायकवाड (सर्व रा. काशीदनगर, पिंपळे गुरव) अशी अटक केलेल्यांची नावे असून मेघा, दीपा (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्यावरही गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी विवाहितेच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची मुलगी सासरी नांदत असताना लग्नात तुझ्या घरच्यांनी काहीही दिले नाही, तुझे माहेरकडील लोक भिकारी असून त्यांची लायकी नाही' असे म्हणत त्यांना त्रास दिला. तसेच हडपसर येथील प्लॉटवर घर बांधण्यासाठी माहेराहून पैसे आणावेत, यासाठी त्यांना वारंवार टोचून बोलून शिवीगाळ करीत. या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली.

दरम्यान, विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी सासरच्यांवर गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com