ऐंशी हजारांसाठी विवाहितेचा छळ; सासरच्या जाचाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल

सकाळ वृत्तसेवा
Monday, 5 October 2020

सासरच्या सततच्या जाचाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चिंचवड येथे घडली. 

पिंपरी : माहेराहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करीत मारहाण केली. शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिली. सासरच्या सततच्या जाचाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चिंचवड येथे घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वर्षा शुभम बगाडे (वय 19, रा. अजंठानगर, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी विवाहितेच्या आईने फिर्याद दिली. त्यानुसार विवाहितेचा पती शुभम सतीश बगाडे (वय 21), सासरा सतीश ऊर्फ सत्यवान बगाडे (वय 48), सासू सविता बगाडे (वय 39), आजी सासू लिलाबाई अशोक ठोसर (वय 40), राजेंद्र अशोक ठोसर (वय 40) व विजय अशोक ठोसर (वय 38, सर्व रा. अशोक हाउसिंग सोसायटी, अजंठानगर, चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

वर्षा व शुभम यांचे लग्न झाल्यानंतर माहेराहून उरलेले ऐंशी हजार रुपये आणण्यासाठी आरोपींनी वर्षा यांच्याकडे तगादा लावला होता. या कारणावरून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ करीत वेळोवळी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. सासरच्या मंडळींकडून वारंवार होणाऱ्या जाचाला कंटाळून वर्षा यांनी शनिवारी (ता. 3) रात्री साडेदहाच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पती, सासू, सासरा, आजी सासू यांना पोलिसांनी अटक केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: married women suicide due to harassment at chinchwad |