भोसरीत केमिकल कंपनीला भीषण आग 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 November 2020

आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग मोठी असल्याने दूरपर्यंत धूर मोठ्याप्रमाणात पसरला. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले. नेमके काय घडले आहे हे पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतल्याने त्याठिकाणी गर्दी झाली.

पिंपरी : भोसरीतील गवळीमाथा येथील एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली. ही घटना शनिवारी (ता.7) दुपारी बाराच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पिंपरीतील मुख्य अग्निशमन केंद्रासह भोसरी, चिखली, प्राधिकरण, रहाटणी, एमआयडीसी आदी उपकेंद्राच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

हृदयद्रावक : वडिलांनी शर्थीचे प्रयत्न करूनही मुलगा बुडाला

आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग मोठी असल्याने दूरपर्यंत धूर मोठ्याप्रमाणात पसरला. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले. नेमके काय घडले आहे हे पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतल्याने त्याठिकाणी गर्दी झाली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 
काही जणांनी त्यांची वाहने रस्त्यावरच उभी केल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचण्यातही अडचण येत होती. भोसरी व पिंपरी पोलिसांनाही घटनास्थळी धाव घेत गर्दी कमी केली. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Massive fire at Bhosari Chemical Company