'पीएमआरडीए'त एन्ट्री झालेल्या अधिकाऱ्याच्या बदलीला स्थगिती...काय म्हणाले मॅट...

'पीएमआरडीए'त एन्ट्री झालेल्या अधिकाऱ्याच्या बदलीला स्थगिती...काय म्हणाले मॅट...

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मुख्य अभियंत्याची राजकीय लागेबांध्यामधून पूर्व पदावर तीन महिन्यांत बदली झाली. अन्‌ त्याच ठिकाणी कार्यरत असलेले सहसंचालक नगररचना तथा महानगर नियोजनकार विजयकुमार गोस्वामी यांना नागपूर महानगर या ठिकाणी बदली दिली गेली होती. मात्र, या शासकीय कारभारावर मॅटने (महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण) कडक ताशेरे ओढत झालेल्या सुनावणीत मंगळवारी (ता. 12) या बदलीला अखेर स्थगिती दिली आहे.

'अवघ्या तीन महिन्यांत वरिष्ठ अधिकाऱ्याची पीएमआरडीएत पुन्हा एन्ट्री' या शीर्षकाखाली 'सकाळ'ने ऑनलाइन वृत्त प्रसिद्ध केले होते. शिवाय भाजप सरचिटणीस व प्रवक्ते अतुल भातखळकर यांनीदेखील या बदलीवर अर्थपूर्ण व्यवहार झाल्याचा दावा केला होता. सनदी अधिकाऱ्यांसहित राजकीय पाठिंबा असल्यानेच या घडामोडी घडल्याचे अखेर निष्पन्न झाले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

तूर्तास तरी पीएमआरडीएमध्ये या दोन्ही बदल्या व नियुक्तीवरून चर्चेला उधाण आले आहे. पीएमआरडीए प्रशासनानेही या बदल्यांवर डोळे झाकून दुजाभाव करत मान्यता दिली, याबद्दल देखील शंका व्यक्त केली जात आहे. पुणे महानगर आयुक्त यांनी बदल्यांच्या सावळ्या गोंधळावर अखेर चुप्पी साधली आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे मॅटच्या निर्णयानंतरही पुणे महानगर आयुक्तांकडून पद मुक्ततेचे पत्र महानगर नियोजनकार यांना दिले गेले आहे. त्यामुळे एकूणच पीएमआरडीएमध्ये सावळा गोंधळ सुरू असल्याचे समोर आले आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काय म्हणाले 'मॅट'

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे महानगर नियोजनकार हे पद रिक्त नसतानाही बदली कशी दिली गेली? वर्ग एकच्या बदल्यांसाठी मुख्यमंत्री व नगरविकास मंत्री यांची मान्यता गरजेची आहे. त्याचप्रमाणे महानगर नियोजनकार या बदलीसाठी कोणतीही बैठक न घेता नियुक्ती झालीच कशी, याबाबद्दल सिव्हिल सर्विस बोर्डानेही आक्षेप घेतला आहे. नागपूर महानगर आयुक्त यांच्याशी देखील चर्चा न होता व पूर्व चर्चा न होता बदली दिली गेली याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com