मावळातील फूल उत्पादकांची 'ही' मागणी होईल का पूर्ण?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 July 2020

निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या मावळ तालुक्यातील फूल उत्पादकांना सरकारने त्वरित मदत करावी, अशी मागणी आंदर मावळातील फूल उत्पादकांनी केली आहे.

वडगाव मावळ (पुणे) : निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या मावळ तालुक्यातील फूल उत्पादकांना सरकारने त्वरित मदत करावी, अशी मागणी आंदर मावळातील फूल उत्पादकांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आंदर मावळातील फूल उत्पादक विश्वनाथ जाधव, गोपाळ पवळे, विकास पिंगळे, बाबुराव अडिवळे, सुरेश लष्करी, दत्ता जाधव, नारायण पारिठे आदींनी तहसीलदार मधुसूदन बर्गे यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, ३ जूनला झालेल्या निसर्ग चक्रीवादळात आंदर मावळातील छप्पन्नपेक्षा जास्त फूल उत्पादकांच्या पॉलिहाउसचे मोठे नुकसान झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार सुनील शेळके, शासकीय अधिकाऱ्यांनी स्वतः या नुकसानीची पहाणी केली आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परंतु, त्यानंतर एक महिना उलटून गेला, तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत काहीही हालचाली व विचारपूस झालेली नाही. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान फार मोठे असून, त्यांना जर वेळेत नुकसान भरपाईच्या स्वरूपात आधार मिळाला नाही; तर ते कोलमडून पडण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maval taluka's flower growers demands for help