Video : पावसाळा आला तोंडावर तरीही महावितरण...

MAHA.jpg
MAHA.jpg

पिंपरी  : दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात महावितरण सेवा ठप्प होऊ नये. यासाठी महावितरणने मॉन्सूनपूर्व काम हाती घेतली आहेत. मात्र पावसाळा सुरू होण्यास काही दिवसांचाच कालावधी उरलेला असताना, अद्याप कामे अपूर्ण असल्याचे चित्र सर्वत्र आहे. अनेक ठिकाणी डीपी बॉक्‍सचीही झाकणे तुटलेली असून केबल उघड्यावर पडल्या आहेत. यंदा लॉकडाउनमूळे विनाअडथळा कामे करता आली असती, परंतु महावितरणने "ये रे माझ्या मागल्या' या उक्तीप्रमाणे कामे अर्धवट ठेवल्यामुळे अपघाताचा धोका संभवतो.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

ही करावी कामे
शहरात सहा लाख 15 हजार वीजग्राहक आहेत. पिंपरी विभाग आणि भोसरी विभागातून शहरात वीजपुरवठा करण्यात येत असतो. पावसाळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवावी लागते.

दरम्य़ान, या मॉन्सूनपूर्व कामांमध्ये महावितरणने विद्युत खांबालगत असलेल्या झाडांच्या फांद्यांची कटाई, डीपीवरील वेली काढण्याचे काम, महावितरण रोहित्रांचे अर्थिंग तपासणे, विजेचे खांबांसह काही ठिकाणी विजेच्या तारा बदलणे किंवा झोल काढणे, तारांचे मजबुतीकरण, जुन्या फिडर पिलरमध्ये इन्शुलेशन स्प्रे मारणे, तुटलेले पीन आणि डिस्क इन्सुलेटर्स बदलणे, ऑइल फिल्टरेशन, उपकेंद्रातील ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जिंग, फ्यूज बदलणे, भूमिगत केबल टाकणे आदी कामे करणे आवश्‍यक आहे. त्यापैकी 70 टक्के पूर्ण झाल्याचा दावा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. तरीही बहुतांश ठिकाणी कामे अपूर्ण असल्याचे चित्र आहे.

अजूनही हिच परिस्थिती
अनेक ठिकाणी डीपी बॉक्‍सची ची झाकणे तुटलेली असून केबल उघड्यावर पडल्या आहेत. अनेक वीजखांबावर वेली वाढलेल्या आहेत. म्हणूनच पावसाळ्यात दुर्घटना होऊ नये, यासाठी महावितरणने वेळीच खबरदारी घेऊन देखभाल दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण करावे, अशी मागणी नागरिक आणि उद्योजकांकडून करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com