सोशल मीडियावर 'म्याव-म्याव'; काय आहे नेमकं प्रकरण?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 February 2021

पिल्ले जन्माला आली की, त्यांचा सांभाळ करण्यासाठी "पालक शोध' मोहिम बरेच जण राबवित आहेत. दत्तक घ्यायचे आहे; पण बऱ्याच अडचणी भेडसावत असल्यास विचारांची देवाण-घेवाण सोशल मीडियाच्या माध्यमातून सोपी झाली आहे. मांजराची नसबंदी व पाळणाघरासारखे प्रश्‍न सध्या प्राणीप्रेमींना मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत

पिंपरी : "गळ्यात घंटा, लोकरीचे उबदार कपडे, बसण्यासाठी ऐटबाज जागा, थाटामाटात साजरा होणारा पहिला वाढदिवस', हे सर्व एखाद्या गोंडस बाळाच्या पालन-पोषणाप्रमाणेच मनीमाऊचे नखरे सध्या मांजरप्रेमी पुरवीत आहेत. मनीमाऊंच्या दिवसभरातील मस्ती व गंमतीजमती सध्या सोशल मीडियावर दररोज शेअर केल्या जात आहेत. शहरातील शेकडो नागरिक या मांजरीच्या ग्रुपला जोडले गेले असून दैनंदिन मांजरींच्या पालन-पोषणात येणाऱ्या अडचणी सर्वजण कमेंटद्वारे सल्लामसलत करून सोडवीत आहेत.

मांजर दत्तक घेण्यापासून ते तिचं आजारपण, शेजाऱ्यांचा किंवा सोसायट्यामधील नागरिकांचा त्रास, रस्त्यावरील मांजरानाही लळा लावून दत्तक घेण्याची मोहीम, त्या मांजरीचे व्हिडीओ शूट करणे, त्याचं खानपान, दिवसभरात त्यांनी घरात केलेली दंगा-मस्ती, नेहमीपेक्षा हिरमुसलेली मांजर आणि त्या पाळीव प्राण्यांची वाटणारी काळजी हे सर्व काही व्हॉट्‌सऍप व फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून मांडले जात आहे.

काँग्रेस - शिवसेनेच्या मैत्रीमुळे राष्ट्रवादी नाराज

"आम्ही मांजर प्रेमी' सारखे बरेच ग्रुप सध्या सोशल मीडियावर यासाठी सक्रिय आहेत. "गळ्यात टाय', "ऐटबाज गॉगल', "मांजरीचा शॉवर' अशा फोटोंची सोशल मीडियावर मोठी क्रेझ आहे. प्रवीण सुतार यांनी मॅक्‍स आणि मिस्टी या मांजरीचा पहिला वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. त्याला तुफान लाईक्‍स व कमेंट्‌स मिळाल्या.

''सोशल मीडियावर लाडक्‍या मनी माऊ विषयी उमटलेल्या मांजरप्रेमीच्या प्रतिक्रिया
सोसायट्यांना त्रास होत आहे. काय करावं. दररोज मांजरीला खाऊ घालावे वाटते पण त्याचा इतरांनाही त्रास होत आहे. मांजर मात्र न चुकता ठरलेल्यावेळी खाण्यासाठी येते.''
- उदय कुलथे, मांजरप्रेमी

पुण्याचे दोन नेते महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी 

''मांजर दत्तक द्यायची किंवा घ्यायची असेल किंवा बेघर मांजरीचा सांभाळ करायचा असेल तर ग्रुप सुरु केला आहे.''
- सागर माने, मांजरप्रेमी

''परदेशातील मांजर घेण्यापेक्षा देशातील मांजर दत्तक घ्या. त्यांचा सांभाळ करा.''
- आकाश गुरव, मांजरप्रेमी

''छोटी माऊ मला हवी आहे. कोणी असेल तर द्या.''
- विश सातपुते, मांजरप्रेमी

''मांजर खूप आवडते. पण ते एकटे घरात राहील का? मांजराला फिरायला कधी नेणार? नखे मारतात का? ती कापावी का? मांजराला नॉनव्हेज लागतं का? केवळ व्हेज चालते का?''
-रचना देशपांडे ,मांजरप्रेमी

''बोक्‍यांनी मांजराला इजा केल्या आहेत काय करावे?''
- स्वप्नील पवार

मांजरीच्या गोंडस नावांचे सोशल मीडियावर बारसे :
गब्बर ,मुजुली, ऍलेक्‍स, गुंडू, लाली, लस्सी, सिंबा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meow-meow groups Active on social media to solve problems Cat Kittens