MHT-CET : एमएचटी-सीईटी परीक्षांच्या पूर्व तयारीसाठी अलार्ड मॉक टेस्ट ॲपची निर्मिती

अलार्ड अभियांत्रिकी महाविद्यालयाने अलार्ड मॉक टेस्ट ह्या नाविन्यपूर्ण ॲपची निर्मिती केली
mht cet mock test application for student hsc Allard Mock Test app education
mht cet mock test application for student hsc Allard Mock Test app educationsakal

हिंजवडी : बारावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महित्वाचा टप्पा आहे आणि त्यानंतरच्या व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी सामायिक प्रवेश परीक्षा आवश्यक आहे.

म्हणजेच एमएचटी सीईटी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयटी पार्क नजकीच्या मारुंजी येथील अलार्ड अभियांत्रिकी महाविद्यालयाने अलार्ड मॉक टेस्ट ह्या नाविन्यपूर्ण ॲपची निर्मिती केली असून हे ॲप सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध आहे.

राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांचे प्रवेश एमएचटी-सीईटी या राज्य सामायिक प्रवेश परीक्षेच्या माध्यमातुन निश्चित होतात. या परीक्षेसाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी अर्ज करतात. प्रवेश परीक्षेसाठी विशेष परिश्रम घेतात.

सर्व स्तरातील विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष परीक्षेची तयारी व्हावी आणि त्यासंबंधीची भीती दूर व्हावी म्हणून अलार्ड अभियांत्रिकी महाविद्यालयाने हे ॲप विकसित केले आहे. ॲपची अधिक माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रुपेश पाटील यांनी सांगितले की बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना एमएचटी-सीईटीच्या तयारीसाठी हे अलार्ड मॉक एमएचटी-सीईटी ॲप तयार केले आहे.

हे ॲप वापरण्यास अत्यंत सहज आणि सुलभ आहे. गुगल प्ले स्टोअरवर हे ॲप उपलब्ध केले असून सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ही त्यांनी केले. ॲपच्या निर्मितीत प्रा. प्रियंका महेंद्र आभाळे यांनी विशेष परिश्रम घेतले आहे. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रुपेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. एल. आर. यादव सचिव डॉ. आर.एस.यादव, महाविद्यालयाचे प्रमुख डॉ. बी.पी.जोशी यांनी कौतुक केले.

ॲपची वैशिष्ट्य

  • गुगल प्ले स्टोअर वर Alard Mock MHT-CET या नावाने उपलब्ध आहे.

  • भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित या विषयांच्या प्रत्येकी १० प्रश्नपत्रिका आहे.

  • एका विद्यार्थ्याला ३० मॉक टेस्ट देता येतील.

  • विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुण आणि त्यांची सविस्तर उत्तरे पाहता येणार.

मॉक टेस्टचे फायदे

  • विद्यार्थ्यांना चांगल्या सरावाची संधी उपलब्ध होते.

  • विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष परीक्षेची तयारी होते.

  • परीक्षेसंबंधीची भीती जाते.

  • अभ्यासातील कच्चे दुवे लक्षात येतात.

  • अभ्यासाच्या उजळणी बरोबरच परीक्षेच्या तयारीची पडताळणी होते.

- बेलाजी पात्रे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com