esakal | लष्करी अधिकाऱ्यांनी असे केले डॉक्टरांचे...

बोलून बातमी शोधा

लष्करी अधिकाऱ्यांनी असे केले डॉक्टरांचे...

- वायसीएम रुग्णालयातील कोरोना वॉरियर्सच्या पाठीशी सैन्य दल

- सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात येऊन डॉक्टर, नर्स व कर्मचाऱ्यांचे वाढविले मनोबल

- केक कापून केले अभिनंदन

लष्करी अधिकाऱ्यांनी असे केले डॉक्टरांचे...
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरी रुग्णालयात कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. कोरोनाला हरविणे, त्यावर नियंत्रण मिळवणे आणि त्याचा प्रसार रोखण्यासाठी योग्य नियोजनाद्वारे अंमलबजावणी केली जात आहे. 

आणखी वाचा - महाराष्ट्रात कुठे काय सुरू राहणार? मुंबई, पुणेकरांना थोडा दिलासा

यात सहभागी  सर्व डॉक्टर्स, परिचारिका व आरोग्य कर्मचारी या कोरोना योद्ध्यांचे मनोबल वाढवण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्सच्या आदेशानुसार कर्नल सुब्रतो गोस्वामी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये रविवारी आले. सैन्य दलाच्या वतीने त्यांनी रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका तसेच आरोग्य कर्मचा-यांशी संवाद साधला. केक आणि मिठाई याचे वाटप करून या कोरोना युद्धात आपण एकटे नसून भारतीय सेना आपल्या सोबत आहे याची ग्वाही दिली.   

आणखी वाचा - म्हणूनच देशावर आली तिसऱ्या लॉकडाऊनची वेळ; स्थिती चिंताजनक

या ह‌दयस्पर्शी भेटीमुळे रुग्णालयात सेवा करत असलेल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे त्यांनी मनोबल वाढविले. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी तथा नोडल अधिकारी डॉ. वर्षा डांगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर खिल्लारे, डॉ. अभयचंद्र दादेवार डॉ. मनजीत संत्रे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता महादेव बोत्रे, परिचारिका  विभागाच्या श्रीमती निगडे, तसेच रूग्णालयातील इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सेनादलाच्या प्रोत्साहनामुळे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये चैतन्य व उत्साह निर्माण झाला आहे. शेवटी ज्या प्रमाणे भारतीय सेना सीमेवर लढून या भारत देशाची सेवा करतात अगदी त्याचप्रमाणे आम्ही आपला वारसा घेऊन या रुग्ण सेवा करू आणि खरोखरच आपल्या या रुग्णालयातील भेटीमुळे रुग्णालयातील सर्व आरोग्य अधिकारी कर्मचारी त्यांचे मनोबल उंचावलेले आहे अशा शब्दांत डॉ. पवन साळवे यांनी सैन्यदलाचे आभार मानले.