पिंपरी-चिंचवड : लॉकडाउनमध्येही दूध वितरण सुरळीत, मात्र विक्रेत्यांना...

पिंपरी-चिंचवड : लॉकडाउनमध्येही दूध वितरण सुरळीत, मात्र विक्रेत्यांना...

पिंपरी : महापालिका प्रशासनाच्या निर्धारित वेळेत दूध वितरण करण्याची परवानगी दिल्यामुळे लॉकडाउनमध्ये शहरवासीयांना नेहमीप्रमाणे दुधाचा सुरळीत पुरवठा करण्यात आला. अनेक दुग्ध व्यावसायिकांनी सकाळीच नागरिकांना घरपोच सेवा दिली. दुसरीकडे, मात्र चहा टपऱ्या, हॉटेल बंद असल्यामुळे दूध विक्रेत्यांनाही या लॉकडाउनचा चांगलाच फटका बसला. दूध हा नाशवंत पदार्थ असल्यामुळे भाजी, फळ विक्रेत्यांप्रमाणेच दूध विक्रेत्यांचेही या काळात आर्थिक नुकसान झाले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात दररोज दीड लाख लिटर दुधाची विक्री होते. कात्रज, चितळे, गोकूळ, अमूल, महानंदा, गोवर्धन डेअरीचे दूध येते. या पाच दिवसांच्या लॉकडाउनमध्ये दूध विक्रेत्यांना महापालिकेने परवानगी दिल्यामुळे दूध खरेदी गर्दी फारशी झाली नाही. एकेका दूग्धव्यावसायिकाकडे दोन हजार लिटर दूधाची विक्री होते. शहरात दररोजचे सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत तीन तास परवानगी दिली असून, सध्या बेकरी, किराणामाल, मिठाई दुकानांसह काही मेडिकलमध्येही दुधाची विक्री होत असल्याचेही दुधाचा मुबलक पुरवठा होत असल्याचे अमन बेकरीचे चालक अमन पानसरे यांनी सांगितले. 

दरम्यान, कोरोना विषाणूंच्या पार्श्‍वभूमीवर मार्च महिन्यापासून हॉटेल, चहाच्या टपऱ्या बंद होत्या. लॉकडाउनमध्ये थोडी शिथिलता आल्याने चहाच्या टपऱ्या, हॉटेल काही वेळेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आल्याने दुधाला मागणी वाढली होती. पण, आता पुन्हा लॉकडाउन जाहीर केल्यामुळे चहाच्या टपऱ्या, हॉटेलसाठी होणारी दुधाची मागणी घटली आहे. लग्नसमारंभात लस्सी, ताक, कुल्फीसह अन्य खाण्याच्या वस्तूंची विक्री वाढते. पण कोरोनामुळे लग्नसमारंभ फारसे नसल्यामुळे लस्सी, कुल्फी तयार करण्याच्या कामातही दुधाचा वापर झालाच नाही.

Edited by : Shivnandan Baviskar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com