Ashwini Jagtap : डोकेदुखी ठरलेल्या ओढ्याची आमदार जगतापांकडून पाहणी; अधिकाऱयांना खडसावताच काम सुरू

वाकडमधील सोसायट्यांना त्रास; अधिकाऱ्यांना घेतले फैलावर
mla ashwini jagtap water pollution stream near society health issue pune
mla ashwini jagtap water pollution stream near society health issue punesakal

- बेलाजी पात्रे

वाकड : येथील सुमारे दहा ते बारा सोसायटी परिसरातून वाहणारा नैसर्गिक ओढा ! मात्र, यात विविध सोसायटींचा, बैठ्या घरांचा व लेबर कॅम्पचा मैला, सांडपाणी सोडल्याने हा ओढा त्रासदायक नाला झाला.

त्यामुळे अस्वच्छता व उग्र दुर्गंधीने हैराण झालेल्या नागरिकांसाठी बुधवारी (ता. १२) आमदार अश्विनी जगताप धाऊन आल्या. त्यांनी ओढ्याची पाहणी केली. आढावा घेत अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. हा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना करताच बुधवारी प्रत्यक्षात कामाला सुरुवातही झाली.

पनाश १-२, यश विस्टेरिया, इम्राल्ड १ ते ४, गणेश इम्पेरिया, शोनेस्ट टॉवर, प्रेस्टीन प्रो लाईफ, गोल्ड फिंगर अवेनियर इत्यादी सोसायटी जवळून वाहणाऱ्या या नाल्यामुळे दुर्गंधी अन डासांचा प्रादुर्भाव आहेच,

याशिवाय पावसाळ्यात नाला ओव्हर फ्लो झाल्यावर काही सोसायटीत पाणी शिरते तर काहींच्या पिण्याच्या टाकीत हे पाणी मिसळते अशी तक्रार येथील रहिवाशांची आहे याबाबत आमदार अश्विनी जगताप यांना चिंचवड निवडणूक सहायक संतोष कलाटे व रणजित कलाटे फाऊंडेशनच्या स्नेहा कलाटे, रणजित कलाटे याांनी निवेदन दिले होते.

त्यामुळे या समस्येची दखल घेत आमदार जगताप बुधवारी सकाळी वाकडमध्ये दाखल झाल्या. त्यांनी अधिकारी व लोकप्रतिनिधींसह प्रत्यक्षात नाल्याची पाहणी केली. यावेळी सहशहर अभियंता (ड्रेनेज व पर्यावरण) संजय कुलकर्णी, स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंते विलास देसले,

मलनि:सारण विभागाचे कार्यकारी अभियंते अनिल राऊत, उपभियंते राजेंद्र जावळे, संतोष कलाटे, माजी नगरसेवक संदीप कस्पटे, विनायक गायकवाड, रणजीत कलाटे, स्नेहा कलाटे, राम वाकडकर यांच्यास विविध सोसायटीचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नाल्याची साफसफाई करून तो पूर्णपणे बंदिस्त करण्यात यावा, रस्त्याची उंची सोसायटीच्या पार्किंग पेक्षा कमी करावी, रस्त्यावरील पथदिवे चालू करावेत इत्यादी कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जगताप यांनी केल्या. तसेच तुम्हाला जमत नसेल तर वेळ पडली तर ही कामे माझ्या आमदार निधीतून करा असेही त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले. या सोसायटी परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावून देण्याचेही आश्वासन त्यांनी यावेळी रहिवाशांना दिले.

गेल्या अनेक वर्षां पासून ह्या समस्येचा सामना येथील रहिवाशी करत आहेत. त्यामुळे महापालिका अधिकारी व रहिवाशांसह नाल्याची संपूर्ण पाहणी केली आणि ही समस्या लवकरात लवकर सोडविण्याच्या सूचना केल्या आहेत. समस्येचे गांभीर्य ओळखून अधिकाऱ्यांनीही आजच्या आज तात्काळ कामाला सुरुवात केली आहे.

- अश्विनी जगताप आमदार चिंचवड

येथे खूप सारे इश्यू होते. ड्रेनेजचे पाणी थेट नाल्यातून वाहत आहे. काही सोसायट्यांचा एसटीपी प्लांट काम करीत नाही त्या थेट पाणी सोडत आहेत त्यांना नोटीस देणार आहोत. काँक्रीट रस्त्याचे कामही सुरू आहे. काही ठिकाणी ड्रेनेज वाहिन्यांचे कामे अर्धवट झाले आहेत. काही वाहिन्या व चेंबर तुटले आहेत ते सर्व दुरुस्ती व रिप्लेस करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

- संजय कुलकर्णी सहशहर अभियंता ड्रेनेज व पर्यावरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com