'या' आमदाराच्या घरातील पाच जणांना कोरोना संसर्ग!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष व भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना कोरोना संसर्ग झाल्याचे सोमवारी (ता. 29) स्पष्ट झाले होते.

पिंपरी : भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष व भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना कोरोना संसर्ग झाल्याचे सोमवारी (ता. 29) स्पष्ट झाले होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचीही तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या पत्नीसह अन्य चार जणांनाही संसर्ग झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. तर, त्यांच्या संपर्कातील अन्य जणांना क्वारंटाइन केले असून, त्यांच्या घशातील द्रावाच्या नमुन्यांचे रिपोर्ट अद्याप प्रलंबित आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

हेही वाचा- धक्कादायक! आता कोरोना थेट पिंपरी महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात

आमदार लांडगे यांच्यासह कुटुंबातील पाच सदस्यांवर चिंचवड- थेरगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या आठवड्यात माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वायसीएम रुग्णालयात भेट दिली होती. त्या दिवशी आमदार लांडगे यांनी वायसीएममधील कोवीड वॉर्डची पाहणी केली होती. तेव्हापासून त्यांना कणकण जाणवत होती. अखेर रविवारी त्यांच्या घशातील द्रवाचे नुमने (स्वॅब) तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्याचा अहवाल सोमवारी आला होता. त्यानंतर कुटुंबीयांसह लांडगे यांच्या संपर्कातील व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील काहींचे रिपोर्ट अद्याप यायचे आहेत. 

Image may contain: 1 person, eyeglasses and beard
आमदार महेश लांडगे

आमदार लांडगे यांच्याकडे पक्षाचे शहराध्यक्षपद असल्यामुळे अनेकांशी त्यांचा संपर्क येत असतो. गेल्या आठवड्यात देवेंद्र फडणवीस यांनी वायसीएम रुग्णालयाला भेट देऊन आढावा घेतला होता. सुमारे सव्वातास ते रुग्णालयात होते. त्यांच्या समवेत आमदार लांडगे यांच्यासह भाजपचे माजी अध्यक्ष व चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, महापौर उषा ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, वायसीएमचे अधिकाष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्यासह अन्य अधिकारी, पदाधिकारीही होते. सुमारे पाऊणतास आढावा बैठक सुरू होती. त्यानंतर फडणवीस यांच्यासह आमदार लांडगे व अन्य पदाधिकाऱ्यांनी वायसीएम बाह्यरूग्ण विभागाला भेट दिली होती. त्याच दिवशी लांगडे यांनी कोविड वॉर्डचीही पाहणी केली होती, अशी माहिती सुत्रांनी दिली. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आमदार लांडगे आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यात आयुक्तांच्या दालनात बैठक झाली. त्यापूर्ची दोन दिवस अगोदरही आमदार लांडगे महापालिकेत आले होते. त्यावेळी त्यांनी आयुक्त व अन्य अधिकारी, पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन आढावा घेतला होता. शिवाय, आमदार लांडगे यांच्या भोसरी येथील संपर्क कार्यालयात अनेक जण कामानिमित्त येत असतात. त्यामुळे आमदारांना संसर्ग कसा झाला? हे सांगणे कठीण आहे. मात्र, वायसीएमला भेट दिली तेव्हापासून त्यांना कणकण जाणवत होती, अखेर तपासणी केल्यानंतर अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Mahesh Landage's five family member were corona infected