Pimpri : वायसीएम रुग्णालय परिसरात मोबाईल सेवा जॅम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

YCM-Hospital

पिंपरी : वायसीएम रुग्णालय परिसरात मोबाईल सेवा जॅम

पिंपरी - महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएमएच) परिसरात गेल्या वर्षभरापासून मोबाईल नेटवर्कची सेवा पूर्णपणे कोसळली आहे. वारंवार मोबाईल नेटवर्क जॅम होत असल्याने संपर्क तुटतो. या समस्येने कर्मचाऱ्यांसह नातेवाईक त्रासले आहे.

शहरातील सर्वात मोठे हे सुपर मल्टीस्पेशालिटी रुग्णालय आहे. येथे दररोज बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) अंतर्गत आणि तातडीच्या आजारासाठी अंदाजे ८०० हुन अधिक रुग्णांची नोंद केली जाते. आयसीयूसह विविध वॉर्डात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, वॉर्डबॉय, आरोग्य सेवक यांना प्रशासकीय आणि रुग्णसेवेसाठी एकमेकांच्या संपर्कात राहावे लागते. रूबी एल केअर, ब्लड बँक, पॅथॉलॉजी, आयसीयू, मेडिकल स्टोअर, वैद्यकीय महाविद्यालय, बाह्य रुग्ण विभाग आदी महत्त्वाच्या विभागांमधील मोबाईल सेवा कायम स्वीच ऑफ’, ‘आउट ऑफ नेटवर्क’ असते.

हेही वाचा: 'ग्रामविकास मंत्रालयाचे १,५०० कोटींचे टेंडर मुश्रीफांच्या घरातच'

कोणालाही फोन लावायचा करायचा असेल तर वैद्यकीय अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांना केबिन सोडून मोकळ्या जागेच्या शोधात पळावे लागते, तेव्हा कुठे नेटवर्क मिळते, अशी तक्रार नातेवाईक रजनी जाधव यांनी केली. रुग्णालयाच्या हेल्प सेंटर क्रमांकाची लॅन्डलाईन सेवा सुद्धा नीट काम करत नाही. कॉल लागल्यानंतर खरखर आवाज येतात. व्होडाफोन (आयडिया), एअरटेल, जिओ, बीएसएनएल या कंपन्यांचे टॉवर्स आणि नेटवर्क सेवा रुग्णालयात चालत नाही, हे प्रशासनाला माहीत नाही काय? असे एका कर्मचाऱ्याने सांगितले. रुग्णांच्या नातेवाइकांनाही रुग्णाच्या प्रकृतीबाबत वेळोवेळी घरी कळविण्याबाबत अडचणी व्यत्यय येतात. सर्वात जास्त रुग्णांची वर्दळ असलेल्या या रुग्णालयाच्या अंतर्गत सर्व परिक्षेत्रात मोबाईल सेवा विना व्यत्यय सुरू राहावी, यासाठी प्रशासनाने आयटी विभागाला सक्षम करावे, अशी अपेक्षा नातेवाइकांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Mobile Service Block Ycm Hospital

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..