Nageshwar Maharaj : विडा 81 लाखांना; मानाच्या ओटीची 33 लाख 55 हजार 555 रुपयांना बोली

81 लाख एक वार एक... 81 लाख एक वार दोन... अन् 81 लाख एक वार, दोन वार, तीन वार.., आणि... आणि... हा मानाच्या विड्याचा लिलाव घेतला आहे...
Atish barane and Akshay Barane
Atish barane and Akshay Baranesakal
Summary

81 लाख एक वार एक... 81 लाख एक वार दोन... अन् 81 लाख एक वार, दोन वार, तीन वार.., आणि... आणि... हा मानाच्या विड्याचा लिलाव घेतला आहे...

मोशी - 81 लाख एक वार एक... 81 लाख एक वार दोन... अन् 81 लाख एक वार, दोन वार, तीन वार.., आणि... आणि... हा मानाच्या विड्याचा लिलाव घेतला आहे... अतिश बारणे व अक्षय बारणे यांनी तब्बल 81 लाख रुपयांना...

असा खर्जातील आवाज घुमत होता...

मोशीतील ग्रामदैवत श्री नागेश्‍वर महाराज देवस्थान सभागृहामध्ये ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज भंडारा उत्सवामध्ये भाविकांनी महाराजांना अर्पण केलेल्या वस्तूंच्या लिलावाप्रसंगी....

मानाच्या विड्याच्या लिलावासाठी लाखोंची बोली लावण्यासाठी श्री नागेश्‍वर महाराज भंडारा उत्सव राज्यात प्रसिद्ध आहे. या उत्सवात यंदाच्या लिलावामध्ये मानाच्या विड्याला तब्बल 81 लाखांची बोली लावली गेली. हा विडा मोशीतील उद्योजक अतिश बारणे व अक्षय बारणे यांनी घेतला. या विड्यातून महाराजांचा आशीर्वाद मिळाल्याची भावना अतिश बारणे व अक्षय बारणे यांनी व्यक्त केली. तसेच, मानाची ओटी भालचंद्र बोराटे यांनी 33 लाख 55 हजार 555 रुपये, मानाचे पहिले लिंबू (फळ) 13 लाख 25 हजार रुपयांना उद्योजक अतिश बारणे, अक्षय बारणे; दुसरे लिंबू राजू बोराटे यांनी 7 लाख 51 हजारांना तर शेवटचे मानाचे लिंबू 17 लाख रुपयांना निरज सस्ते यांनी बोली लावून घेतली.

दीडशे वर्षांहून अधिक काळ श्री नागेश्वर महाराज यांनी स्वतः सुरु केलेली परंपरा जतन करून येथील हा भंडारा उत्सव आजही सुरू आहे.

रविवारी (ता.19) येथील श्री नागेश्वर महाराज भंडारा उत्सव संपन्न झाला. यावेळी सुमारे एक लाखांहून अधिक भाविकांनी बुंदी व शाकभाजीचा महाप्रसाद घेतला. याच भंडारा उत्सवात महाराजांना अर्पण केलेल्या मानाची ओटी, विडा, फळे (लिंबू), आदी वस्तूंसह स्थानिक ग्रामस्थ महाराजांना सोन्या-चांदीचे दागिने, शेतातील फळे, भांडी, भाजीपाला यासह विविध वस्तू अर्पण करतात. महाराजांचा मानाचा विडा, मानाची ओटी व मानाचे लिंबू आदी वस्तूंचा लिलावास सोमवारी (ता.20) सकाळी दहा वाजता सुरुवात झाली.

पिढ्यान् पिढ्या या लिलावाची बोली लावण्याचे काम नारायण केदारी, सागर केदारी आणि निखिल केदारी यांनी केले. आपल्या खर्जातील आवाजात एक-एक वस्तूंची ते बोली लावत होते. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा लिलाव सुरू होता. यावेळी देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, विश्वस्त व मोशी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘

श्री नागेश्वर महाराजांना अर्पण केलेल्या मानाच्या वस्तूंपैकी मानाचे पहिले लिंबू (फळ) 13 लाख 25 हजार रुपयांना उद्योजक अतिश बारणे, अक्षय बारणे; दुसरे लिंबू राजू बोराटे यांनी 7 लाख 51 हजारांना तर शेवटचे मानाचे लिंबू 17 लाख रुपयांना निरज सस्ते यांनी घेतले.

मानाचे पहिले लिंबू (फळ) 13 लाख 25 हजार, दुसरे लिंबू 7 लाख 51हजार शेवटचे लिंबू 17 लाख, मानाची ओटी 33 लाख 55 हजार 555, मानाचा विडा 81 यांसह विविध वस्तूंच्या लिलावातून एकूण दिड कोटींहून अधिक लिलाव तथा देणगी स्वरुपातील ही रक्कम देवस्थान ट्रस्टकडे जमा होणार असून तिचा विनियोग देवस्थानच्या प्रगतीसाठी केला जाईल असे ट्रस्टकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com