Sanjay Raut : संजय राऊत यांना ‘ग’ची बाधा ; खासदार बारणे

श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांचा कायमच आदर केला आहे. केवळ द्वेषापोटी नाव घेतल्यावर थुंकणे हे राऊत यांना शोभत नाही. त्यांच्या या कृतीचा जाहीर निषेध करत आहे.
Sanjay Raut
Sanjay Rautsakal

पिंपरी - एखाद्या नेत्यांने द्वेषापोटी किती खालच्या पातळीवर जावे याला मर्यादा आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव घेतल्यावर थुंकणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही. मात्र, खासदार संजय राऊत यांना ‘ग’ची बाधा झाली आहे, अशी टीका खासदार श्रीरंग बारणे यांनी शनिवारी (ता. ३) पत्रकार परिषदेत केली.

Sanjay Raut
Pune Accident: दुर्दैवी! पुण्याच्या वाघोलीत ट्रकखाली सापडून एकोणीस वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

मुंबईमध्ये खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद सुरू होती. त्यावेळी माध्यम प्रतिनिधींनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विषयी प्रश्न विचारला. प्रश्न विचारताच राऊत जमिनीवर थुंकले. यावरून शिंदे गट आणि भाजपने राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली. त्याबाबत विचारले असता खासदार श्रीरंग बारणे बोलत होते.

Sanjay Raut
Mumbai Local: उद्या पश्चिम रेल्वेवर १४ तासांचा ब्लॉक; या गाड्यांवर होणार परिणाम, जाणून घ्या वेळापत्रक

बारणे म्हणाले की, संजय राऊत यांना श्रीकांत शिंदे यांच्याविषयी माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता अतिशय लज्जास्पद कृत्य केले आहे. शिंदे हे २०१४ पासून खासदार आहेत. त्यांच्याविषयी बोलत असताना एखाद्या नेत्यांने द्वेषापोटी किती खालच्या पातळीवर जावे याला मर्यादा आहे. त्यांना गर्व झालेला आहे. श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांचा कायमच आदर केला आहे. केवळ द्वेषापोटी नाव घेतल्यावर थुंकणे हे राऊत यांना शोभत नाही. त्यांच्या या कृतीचा जाहीर निषेध करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com