esakal | खासदार सुप्रिया सुळे यांनी केली विप्रोच्या कोविड रुग्णालयाची पाहणी अन् म्हणाल्या... 
sakal

बोलून बातमी शोधा

खासदार सुप्रिया सुळे यांनी केली विप्रोच्या कोविड रुग्णालयाची पाहणी अन् म्हणाल्या... 

मुळशीच्या एकदिवसीय दौऱ्यावर आल्यावर सुळे यांनी हिंजवडीत नव्याने उभारलेल्या विप्रो कोविड रुग्णालयाला भेट देऊन त्याची पाहणी केली.

खासदार सुप्रिया सुळे यांनी केली विप्रोच्या कोविड रुग्णालयाची पाहणी अन् म्हणाल्या... 

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

हिंजवडी : "विप्रो कंपनीने एवढे प्रशस्त आणि अद्ययावत रुग्णालय माझ्या मतदार संघात उभारल्याबद्दल त्यांचे कौतुक कोणत्या शब्दात करावे, यासाठी माझ्याकडे शब्द अपुरे आहेत," असे गौरवोद्गार बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हिंजवडीतील विप्रो कोविड रुग्णालयाच्या पाहणी दरम्यान काढले.   

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    

मुळशीच्या एकदिवसीय दौऱ्यावर आल्यावर सुळे यांनी हिंजवडीत नव्याने उभारलेल्या विप्रो कोविड रुग्णालयाला भेट देऊन त्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुळशीची परस्थिती जाणून घेण्यासाठी शनिवारी (ता. 20) सकाळी 10 वाजताच त्यांनी मुळशी तालुक्याचा दौराही केला. मुळशीच्या नुकसानी संदर्भात माहिती घेण्यासाठी त्यांनी प्रशासकीय आधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. प्रशासनाने जीव धोक्यात घालून गेल्या तीन महिन्यात कोरोना लढ्यात केलेल्या उत्तम कामाचं त्यांनी कौतुकही केले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रुग्णालयाची पाहणी करताना विप्रोचे प्रतिनिधी डॉ. महेश कांत, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण, हिंजवडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत गवारी, पौडचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, गटविकास अधिकारी संदीप जठार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजित कारंजकर, मंडळ अधिकारी हेमंत नायकवडी, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी लकडे, ग्रामविकास अधिकारी टी. व्ही. रायकर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि कामाला लागा आशा सूचना अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना  केल्या.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा