पिंपरीत महावितरण कर्मचाऱ्याला दांडक्याने मारहाण

झाडाच्या फांद्या कोणाच्या आदेशाने तोडता ,असे म्हणत एकाने महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण केली. हा प्रकार पिंपरी येथे घडला.
MSEDCL employee beaten in Pimpri
MSEDCL employee beaten in PimpriSakal

पिंपरी : झाडाच्या फांद्या कोणाच्या आदेशाने तोडता ,असे म्हणत एकाने महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण केली. हा प्रकार पिंपरी येथे घडला. याप्रकरणी रामेश्वर बळीराम वाघमारे (रा. म्हाडा वसाहत, संकल्प सोसायटी, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नागराज शंकर भांडेकर (वय ४५,रा. गांधीनगर झोपडपट्टी, पिंपरी) याला पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी (ता. १९) सकाळी साडे अकराच्या सुमारास फिर्यादी हे वरिष्ठांच्या आदेशानुसार जी झाडे इलेकट्रीक वायरला स्पर्श करून धोका निर्माण होऊ शकतो, अशा झाडांच्या फांद्या कापण्याचे काम करीत होते.

यासाठी ते पिंपरीतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक ग्रंथालयामागील ट्रान्स्फार्मर व त्याचा डिस्ट्रिब्युशन ट्रान्स्फार्मर येथे गेले. ट्रान्स्फार्मरला स्पर्श करणाऱ्या फांद्या कापत असताना आरोपी तेथे आला. 'तुम्ही फांद्या कोणाच्या आदेशाने कापता' असे म्हणत फिर्यादीला शिवीगाळ करून दांडक्याने मारहाण करून त्यांना जखमी केले. शासकीय कामात अडथळा निर्माण केला. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com