esakal | ‘म्यूकरमायकोसिस’ काळाबाजार प्रकरणात २२ इंजेक्शन जप्त; दोघांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Mucormycosis Injection

‘म्यूकरमायकोसिस’ काळाबाजार प्रकरणात २२ इंजेक्शन जप्त; दोघांना अटक

sakal_logo
By
प्रशांत पाटील

पिंपरी - म्यूकरमायकोसिस (Mucormycosis) या आजारावरील इंजेक्शनची (Injection) काळ्या बाजारात (Black Market) विक्री केल्याप्रकरणी आणखी दोघांना वाकड पोलिसांनी (Police) अटक केली. त्यांच्याकडून २२ इंजेक्शन जप्त (Seized) केले आहे. (Mucormycosis 22 Injection Seized Black Market Crime)

शरणबसवेश्वर सिद्धेश्वर ढमामे (वय ३८, रा. विजापूर रोड, सोलापूर), राजशेखर कासाप्पा भजंत्री (वय ३३, रा. गुलबर्गा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. इंजेक्‍शनची काळ्या बाजारात विक्री केल्याप्रकरणी ७ जूनला गुंडा स्कॉडने पाच जणांना अटक केली. याप्रकरणी वाकड ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस तपास करीत असताना आरोपींच्या मोबाईल फोनचा तांत्रिक तपासावरून ढमामे याचा या गुन्ह्यात समावेश असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला सोलापूर येथून अटक केली. औषधांचा अवैध पुरवठा गुलबर्गा येथून होत असल्याचे पुढील तपासात समोर आले. त्यानुसार पोलिसांनी गुलबर्गा येथे सापळा लावून आरोपी भजंत्री याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ८४ हजार रुपये किंमतीचे लिपोसोमोल एमफोटेरिसियिन-बी हे १४ इंजेक्शन व ६० हजार रुपये किंमतीचे एमफोटेरिसियिन बी लिपोसोम हे ८ असे एकूण २२ इंजेक्शन जप्त केले.

हेही वाचा: लॉकडाउनमुळे अनेक जोडपी विभक्तच्या मार्गावर

आरोपी भजंत्री हा गुलबर्गा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, गुलबर्गा या शासकीय रुग्णालयात कोविड तसेच म्यूकरमायकोसिस विभागात नर्सिंग स्टाफमध्ये आहे. त्यामुळे या गुन्ह्यात मेडिकल कॉलेजमधील आणखी कुणाचा सहभाग आहे का, याबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली. तसेच आरोपींनी सोलापूर येथे देखील काही औषधे विकली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या आरोपींवर फसवणूक, विनापरवाना, छापील किमतीपेक्षा अधिक किमतीने औषध विक्री करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. वाकड पोलिस तपास करीत आहेत.

loading image