मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक संथ गतीने, सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी

विकेंडला जोडून आलेल्या सलग सुट्यांमुळे शुक्रवारी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठ्या संख्येने वाहने आल्याने बोरघाटात वाहतूक संथ गतीने सुरु आहे.
Express Way Traffic
Express Way TrafficSakal
Summary

विकेंडला जोडून आलेल्या सलग सुट्यांमुळे शुक्रवारी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठ्या संख्येने वाहने आल्याने बोरघाटात वाहतूक संथ गतीने सुरु आहे.

लोणावळा - विकेंडला जोडून आलेल्या सलग सुट्यांमुळे (Holiday) शुक्रवारी मुंबई-पुणे द्रुतगती (Mumbai-Pune Express Way) मार्गावर मोठ्या संख्येने वाहने (Vehicle) आल्याने बोरघाटात वाहतूक (Transport) संथ गतीने (Slow) सुरु आहे. याचदरम्यान खंडाळा एक्झिट येथे घाट चढताना अवजड जॉब घेऊन जाणारा ट्रेलर बंद पडल्याने वाहतूकीचा खोळंबा झाला होता.

आंबेडकर जयंती, भगवान महावीर जयंती, गुड फ्रायडे, हनुमान जयंती आणि ईस्टरसंडे या सणांच्या सुट्टया तसेच शनिवार, रविवार असा १४ ते १७ एप्रिल लॉंग विकेंड जोडून आल्याने पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी अनेकांनी प्लॅन केले. मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडले, त्यामूळे पर्य़टनस्थळांवर पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे.

बोरघाटात वाहतुकीवर ताण आल्याने शुक्रवारी सकाळपासूनच वाहतूक सावकाश सुरु होती. त्यात खंडाळा एक्झिटजवळ अवजड ट्रेलर बंद पडल्याने दुपारी पुण्याकडे जाणारी वाहतूकीचा खोळंबा झाला. खंडाळा बोगदा, अमृतांजन पुल, दस्तूरी अंडा पॉईंट येथे वाहतूकीची कोंडी झाली. बोरघाट पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने ट्रेलर बाजूला केला. मात्र तोपर्यंत बोरघाटात तीन ते चार किलोमीटरवर वाहनांच्या लांब रांगा लागल्याने वाहतूक संथ गतीने सुरु आहे. बंदोबस्तामुळे अपुऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांमुळे वाहतूकीवर मोठा ताणा आल्याने वाहनांच्या लांब रांगा लागल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com