esakal | खासगी रुग्णालयांतील बिलांचे महापालिकेकडून होणार लेखापरीक्षण

बोलून बातमी शोधा

PCMC
खासगी रुग्णालयांतील बिलांचे महापालिकेकडून होणार लेखापरीक्षण
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - कोविड उपचारासाठी महापालिकेने शंभरहून अधिक रुग्णालयांना परवानगी दिलेली आहे. तेथील बेड मॅनेजमेंटची माहिती मिळण्यासाठी कनिष्ठ अभियंत्यांची समन्वयक म्हणून नेमणूक केलेली आहे. अशा रुग्णालयात दाखल रुग्णांच्या उपचाराची बिले वाजवीपेक्षा अधिक आल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे अशा बिलांचे लेखापरीक्षण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतलेला असून, त्यासाठी पथके नियुक्त केली आहेत.

खासगी रुग्णालयांतील उपचाराच्या बिलांची तपासणी करण्यासाठी महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक आमोद कुंभोजकर यांची नियंत्रण प्रमुख म्हणून आयुक्त राजेश पाटील यांनी नियुक्ती केली आहे. त्यांच्या जोडीला लेखाधिकारी किशोर शिंगे, पद्माकर कानिटकर, तांत्रिक बाबींसाठी दीपक पाटील, संजय काशीद यांची नेमणूक केली आहे. तसेच, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय आठ पथके निर्माण केलेली आहेत. प्रत्येक पथकात ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, लेखाधिकारी, लेखापाल, उपलेखापाल, मुख्य लिपिक, लिपिक व कनिष्ठ अभियंता अशा आठ जणांचा समावेश आहे.

हेही वाचा: पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णांसाठी २२ टन ऑक्सिजन

लेखापरीक्षण पथकाचे काम

  • शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये शासकीय दरानुसार बिल आकारले जाईल, याबाबत पूर्व पडताळणी (प्री-ऑडिट) करणे

  • हॉस्पिटलच्या ड्राफ्टबिलाची तपासणी ऑडिट पथकामार्फत करून रुग्णाला अंतिम बिल देण्याची सूचना रुग्णालयांना करणे

  • खासगी रुग्णालयांमार्फत आकारल्या जाणाऱ्या सर्व बिलांचे लेखापरीक्षण करणे, त्यातील त्रुटींचे वेळीच निराकरण करणे

  • नव्याने खासगी रुग्णालय अधिग्रहीत केल्यास त्याबाबतही अशाच पद्धतीने कार्यवाही करणे.