महापालिका कर्मचाऱ्यांना 25 वर्षानंतर मिळाली पदोन्नती

Municipal employees get promotion after 25 years
Municipal employees get promotion after 25 years

पिंपरी : महापालिका प्रशासनाने तांत्रिक आणि लेखा विभागातील 103 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. त्यापैकी 70 लिपीकांची पदोन्नती रखडली होती. वरिष्ठ लिपिक पदावर पदोन्नती मिळाल्याने 25 वर्षापासूनच प्रलंबित असणारा पदोन्नतीचा विषय मार्गी लागला आहे.

महापालिका आस्थापनेवर वरिष्ठ पदे भरण्यासाठी तसेच वरिष्ठ लिपिक पदावर पदोन्नती देण्याबाबत 2008 मध्ये पदोन्नती समिती सभा आयोजित केली होती. या समितीने लिपिक पदावरील कर्मचाऱ्यांना त्यांची सेवाज्येष्ठता, शैक्षणिक, गोपनीय अभिलेख, सेवा विषयक माहिती व आरक्षण याबाबी विचारात घेऊन वरिष्ठ पदावर पदोन्नती देण्याची शिफारस केली होती. त्यास विधी समितीनेदेखील मान्यता दिली होती. परंतु जागा रिक्त नसल्याचे सांगत प्रशासनाकडून पदोन्नती देण्यात आली नव्हती. त्यातील 70 लिपिक कार्यालयीन अधीक्षकाचे वेतन घेत आहेत. मात्र त्यांना पदोन्नती मिळाली नव्हती. मात्र आता कर्मचारी निवृत्त झाल्यामुळे रिक्त जागांवर प्रशासन अधिकारी, मुख्य सुरक्षा अधिकारी, सुरक्षा अधिकारी, कार्यालय अधीक्षक, उपलेखापाल, मुख्य लिपिक, उच्चस्तर लघुलेखक , दूरध्वनी पर्यवेक्षक अशा पदांवर 103 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आल्याची माहिती प्रशासन अधिकारी राजेश आगळे यांनी दिली. याबाबत महासंघाचे माजी अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे, कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षा सीमा सुकाळे व सहकारी कर्मचारी उमेश बांदल यांनी स्व:त महापौर उषा ढोरे, पक्षनेत्यांकडे पाठपुरावा, चर्चा करून निर्णय घेण्यात आला.

सेवानिवृत्ती होताना पदोन्नती
भूमी व जिंदगी विभागात मुख्य लिपिक पदावर कार्यरत असलेल्या जयश्री भोसले या सेवा ज्येष्ठतेनुसार या तिसऱ्या क्रमांकावर होते. परंतु त्यांना डावलून इतरांना पदोन्नती दिली. त्यावर त्यांनी लेखी आक्षेप घेत हरकत घेतली. त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या दाद मागितल्यावर त्यांना कार्यालयीन अधीक्षकपदावर पदोन्नती दिली. याबाबत उपायुक्त मनोज लोणकर यांनी चूक झाल्याचे मान्य केले. भोसले या 31 जानेवारी 2021रोजी सेवानिवृत्त होत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com