
भोसरी, इंद्रायणीनगरातील पाणी समस्या सुटली
भोसरी : भोसरी आणि इंद्रायणीनगरातील काही भागांमध्ये पाणी येत नाही, तर काही भागामध्ये कमी दाबाने पुरवठा होत आहे. याविषयी ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिकेने दखल घेऊन पाणीपुरवठा सुरळीत केला. चक्रपाणी वसाहतीतील अक्षयनगर परिसरात दुपारी १२ ते सायंकाळी पाच या वेळेत पाणी सोडण्यात येत होते. सुरुवातीच्या भागातील नागरिक मोटार वापरून पाणी भरत असल्याने शेवटचे टोक असणाऱ्या अक्षयनगरातील काही भागात सायंकाळी साडेचार पाच वाजता पाणी येत होते, तेही कमी दाबाने.
त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी भरता येत नव्हते. त्याचप्रमाणे इंद्रायणीनगरातील इमारत क्रमांक ३१ आणि खंडे वस्तीमध्येही कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या होत्या. ही परिस्थिती ‘सकाळ’ने मांडली होती.
आता या भागात समस्या
इंद्रायणीनगरातील राजवाडा इमारत क्रमांक २२, २३, २४ आणि परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार येथील नागरिक इम्रान तांबोळी यांनी केली आहे. त्याचप्रमाणे पेठ क्रमांक तीनमधील समर्थ नगरमध्येही कमी दाबाने पाणीपुरवठ्याची तक्रार स्वदीप अडसूळ यांची आहे. ही समस्या तातडीने सोडविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
Web Title: Municipal Water Supply Department Solved Water Problem In Bhosari Indrayani Nagar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..