esakal | झोपेतच महिलेचा खून; काळेवाडीतील घटना, कारण अस्पष्ट
sakal

बोलून बातमी शोधा

झोपेतच महिलेचा खून; काळेवाडीतील घटना, कारण अस्पष्ट

घरात झोपलेल्या महिलेचा डोक्‍यात धारदार हत्याराने मारून खून करण्यात आला.

झोपेतच महिलेचा खून; काळेवाडीतील घटना, कारण अस्पष्ट

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : घरात झोपलेल्या महिलेचा डोक्‍यात धारदार हत्याराने मारून खून करण्यात आला. ही घटना काळेवाडी येथे घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

छाया पांडुरंग गुंजाळ (वय 52, रा. तुळजाभवानीनगर, काळेवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. छाया या झोपेत असताना अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. हा प्रकार शुक्रवारी (ता. 16) सकाळी सहाच्या सुमारास कुटुंबीयांच्या लक्षात आला. धारदार हत्याराने वार केल्याने त्यांच्या डोक्‍यात गंभीर जखम होऊन रक्तस्त्राव झाला होता. दरम्यान, छाया यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. छाया यांचा खून कोणत्या कारणासाठी झाला, नेमके हल्लेखोर कोण आहेत, याबाबतचा शोध वाकड पोलिस घेत आहेत. घटनास्थळाची पाहणी करण्यासह कुटुंबीय व परिसरातील नागरिकांकडे चौकशी करीत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी घटनास्थळी भेट देत अधिकाऱ्यांना तपासाबाबतच्या सूचना दिल्या.