ईदनिमित्त दरवळणारा अत्तराचा सुगंध यंदा गेला कुठं...वाचा

ईदनिमित्त दरवळणारा अत्तराचा सुगंध यंदा गेला कुठं...वाचा

पिंपरी : मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा सण सोमवारी (ता. २५) साजरा होत आहे. कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून व्यवसाय ठप्प असून, बाजारपेठाही बंद आहेत. ईदसाठी नवीन कपड्यांसह वेगवेगळ्या अत्तरांचा सुगंध विशेष असतो. यंदा मात्र, मुस्लिम बांधव घरी राहूनच ईद साजरा करणार असल्याने तो घरातच दरवळणार आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील बंद बाजारपेठा दोन दिवसांपूर्वी खुल्या केल्या होत्या. परंतु, रुग्णांची वाढती संख्या पाहता त्या पुन्हा बंद केल्या. त्यामुळे आवश्‍यक सर्व साहित्याची खरेदी करता आली नाही. महापालिका प्रशासनाने ईदची नमाज आणि उत्साह घरात राहूनच साजरा करायचे निर्देश जारी केले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरवर्षी शिरखुर्म्यासाठी लागणारे साहित्य व मसाल्याच्या पदार्थांची खरेदी अल्प होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. बाजारपेठा बंद असल्याने काही मुस्लिम बांधवांनी नमाज टोपी, सुरमा, रुमाल, लहान मुलांच्या टोप्या तसेच महिलांनी खास जन्नते फिरदोस या अत्तराची खरेदी केल्याचे विक्रेते आयुब शेख यांनी सांगितले.

शिरखुर्मा साहित्य (दर प्रतिकिलो रुपयांत )

  • काजू- ६५० ते ७५०
  • बदाम- ७०० ते ७६०
  • बेदाणे - ३०० ते ३२०
  • अक्रोड - १२०० ते १४००
  • शेवया - १०० ते १२०
  • साहित्य
  • नमाज टोपी - ४० ते २२०
  • सुरमा -२० ते ८०
  • अत्तर - ५० ते ५००

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

स्वतःबरोबर इतरांची काळजी घ्या

पिंपरी-चिंचवड मुस्लिम विकास परिषदेचे अध्यक्ष अकील मुजावर यांनी मुस्लिम समुदायांना आवाहन केले आहे की, नमाज आपापल्या घरीच अदा करावी. कोणीही ईदगाह मैदानावर जाऊ नये. रस्त्यावर शुभेच्छांसाठी गर्दी करू नये. एकमेकास गळाभेट अथवा हस्तांदोलन करू नये. आपली स्वतःची व इतरांची काळजी घ्या. कोरोनाचा नायनाट करण्यासाठी विशेष प्रार्थना करावी. सुरक्षेबाबत कडक नियम असल्याने अनेकांनी ईदची दावतही रद्द केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com