मुस्लिम बांधवांनी शीरखुर्म्याचा अक्षय गोडवा हिंदू बांधवांच्या घरी पोचवला

मोलमजुरी करणाऱ्यांची वस्ती. सर्वांचेच हातावर पोट. पण, त्यांच्या चेहऱ्यावर आज आनंद होता. त्यात कोणी मुस्लिम होते, तर कोणी हिंदू.
Sheerkhurma
SheerkhurmaSakal

वाकड - मोलमजुरी करणाऱ्यांची वस्ती. सर्वांचेच हातावर पोट. पण, त्यांच्या चेहऱ्यावर आज आनंद होता. त्यात कोणी मुस्लिम (Muslim) होते, तर कोणी हिंदू. (Hindu) मुस्लिम बांधव सकाळपासून शीरखुर्मा (Sheerkhurma) बनविण्याच्या लगबगीत होते. तर, हिंदू बांधवांच्या घरात पितरांना आमरस पोळीचा नैवेद्य दाखवला जात होता. निमित्त होते, रमजान ईद (Ramjan Eid) आणि अक्षय्य तृतीयेचे. (Akshay Tritiya) दोन्ही धर्मांसाठी (Religion) पवित्र सण. (Festival) यातही भाईचारा राखत मुस्लिम बांधवांनी शीरखुर्म्याचा अक्षय गोडवा हिंदू बांधवांच्या घरी पोचवला, हे सामाजिक एकतेचे चित्र शुक्रवारी वाकडमधील काळाखडक वसाहतीत दिसून आले. (Muslim Society Ramjan Eid sheer khurma akshay tritiya Hindu Society)

कोरोना, लॉकडाऊन अन् हाताला नसलेला कामधंदा, यामुळे बहुतेकांची आर्थिक विवंचना सुरू आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेचा सण असूनही काहींना दरवर्षीप्रमाणे गोडधोड करून लेकरांना घालता आले नाही. काहींनी उधार-उसनवारी करून केवळ पितरांच्या नैवेद्यापुरती व्यवस्था केली. मात्र, त्यांचाही सण गोड व्हावा, या हेतूने शाहरुखभाई खान युवा मंच व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांनी घरोघरी शीरखुर्मा पोच करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठीच ते सकाळपासून राबत होते आणि दुपारनंतर शीरखुर्म्याचा डबा घरोघरी पोचला. अनेकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले. यामध्ये हिंदू-मुस्लिम आदर्शवत भाईचारा दिसून आला. समानता व एकतेचा उत्सव दिसला. तब्बल दीड हजार कुटुंबांनी शीरखुर्म्याचा आस्वाद घेतला. यासाठी आरपीआयचे शहर युवकाध्यक्ष कुणाल वाव्हळकर, उपाध्यक्ष शाहरुख खान, कुदरत खान, अस्लम खान, शाहरुख सय्यद, गफूर शेख यांनी संयोजन केले.

लॉकडाऊनमध्ये अत्यंत हलाखीचे दिवस काढत आहोत. अशातच अक्षय्य तृतीयेचा सण आला. मात्र, आमच्या सारख्या सर्वसामान्यांना या सणाचे सोयरसुतक नव्हते. मात्र, शिरखुर्मा भेट आल्याने आमचा सण गोड झाला.

- नीलेश ओव्हाळ, काळाखडक, वाकड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com