मावळ : प्लाझ्मा दान करून शेलारवाडीतील 'हा' तरुण ठरला देवदूत

मावळ : प्लाझ्मा दान करून शेलारवाडीतील 'हा' तरुण ठरला देवदूत

बेबडओहोळ (ता. मावळ) : कोरोनावर यशस्वी मात करणाऱ्या तरुणाने एका पॉझिटिव्ह व्यक्तिला प्लाझ्मा दान केला. त्यामुळे शेलारवाडी येथील हा तरुण खऱ्या अर्थाने देवदूत ठरला आहे.

शेलारवाडीमध्ये गेल्या महिन्यात नंदकुमार बाळासाहेब शेलार हा पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. त्याने कोरोनावर यशस्वी मात केली. 'प्लाझ्मा पाहिजे', असा हा मेसेज ३० जुलै रोजी सोशल मीडियावर वायरल झाला. तो मेसेज शेलार यांनी पाहिला. त्यांनी संबंधित व्यक्तीला फोन करून प्लाझ्मा देण्यासंदर्भात सांगितले. या कुटुंबातील आई-वडील, पत्नी, दोन मुले असे पाच व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे सांगितले. त्या कुटुंबातील आई-वडील हे दोघे अतिदक्षता विभागात उपचार घेत असून, त्यांना तातडीने प्लाझ्मा उपचाराची आवश्यकता होती, अशा वेळी शेलार यांनी प्लाझ्मा दान करून वेगळा आदर्श निर्माण केला. आज संबंधित प्लाझ्मा दान केलेली व्यक्तिची तब्येत व्यवस्थित असल्याचे शेलार यांनी केले.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांपैकी प्लाझ्मा दान करण्यासाठी कुणी पुढे येत नाही, अशा वेळी आपल्या गावातील या तरुणाने केलेले प्लाझ्मा दान म्हणजे एक अभिमानाची गोष्ट आहे. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे गावातील सामाजिक कार्यकर्ते सतिश भेगडे यांनी सांगितले.

प्लाझ्मा दान म्हणजे?

कोरोनावर शाश्वत इलाज नाही. रक्तदान करतात तसेच, प्लाझ्मा दान करतात. कोरोनामुक्त रुग्णांच्या शरीरातील अॅन्टिबॉडीज इतर रुग्णांना जीवनदान देण्याकामी उपयोगी ठरू शकतात. एका कोरोनामुक्त रुग्णाच्या प्लाझ्माच्या माध्यमातून चार ते पाच कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तिंना अॅन्टिबॉडीज तयार करण्यासाठी मदत होते. कुठलाही आजार नसलेला सुदृढ कोरोनामुक्त रुग्ण बरा झाल्यानंतर २८ दिवसांपासून प्लाझ्मा दान करू शकतो.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com