राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस म्हणतेय शैक्षणिक शुल्काची सक्ती केल्यास... 

ncp.jpg
ncp.jpg

पिंपरी ः शिक्षण संस्थांनी 2020-21 या वर्षासाठी शुल्कवाढ करु नये. तसेच शैक्षणिक शुल्क भरण्याबाबतचा तगादा संस्थांनी पालकांकडे लावू नये, असे राज्य सरकारचे आदेश असतानाही शहरातील शिक्षण संस्था ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली शुल्क भरण्याची सक्ती करत आहेत. अशा शिक्षण संस्थाचालकांच्या दबावामुळे त्रस्त झालेल्या पालकांनी मनपा शिक्षण मंडळ किंवा शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केले आहे. 

ताथवडे येथील एका स्कूल व्यवस्थापनाने काही विद्यार्थ्यांच्या पालकांना या प्रकारे शुल्क भरण्यासाठी तगादा लावला होता. ज्या पालकांनी शुल्क भरले नाही. अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळत नव्हते. त्यामुळे, त्रस्त पालकांनी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. तिची दखल घेत विशाल वाकडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर उपाध्यक्ष मयूर जाधव, सरचिटणीस चेतन फेंगसे यांनी पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्याकडे तक्रार केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तसेच मंडळाचे तक्रार निवारण अधिकारी विलास पाटील यांनी पालक प्रतिनिधी व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी, पालक प्रतिनिधी यांच्यासमवेत संबंधित स्कूलच्या पर्यवेक्षकांसमवेत बैठक घेतली. त्यामध्ये, पाटील यांनी शाळा व्यवस्थापनाला समज दिली. तसेच विद्यार्थ्यांचे लॉगीन आयडी, पासवर्ड पुढील बारा तासांत सुरु करावेत. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये, असे आदेश दिले. 

त्यानंतर, शाळा व्यवस्थापनाने सर्व विद्यार्थ्यांचे लॉगीन आयडी आणि पासवर्ड पुन्हा सुरु केले. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पालक व विद्यार्थ्यांना न्याय मिळाला, अशी कृतज्ञता पालक प्रतिनिधींनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com