Pimpri Chinchwad: महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आणि राहुल कलाटे आमने-सामने

दोघांच्याही कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांना उचलून घेत मोठा जल्लोष
ncp Nana kate And independent candidate rahul Kalate politics election pimpri
ncp Nana kate And independent candidate rahul Kalate politics election pimprisakal

Pimpri Chinchwad News: महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे हे थेरगाव येथे निवडणूक कार्यालयासमोर मंगळवारी (ता. ७) आमने-सामने आले होते. दोघांच्याही कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांना उचलून घेत मोठा जल्लोष केला. त्यामुळे काहीवेळा तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे हे “ग” क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करून बाहेर पडत होते. विरोधी पक्षनेते अजित पवार हेही त्यांच्यासोबत होते. त्याचवेळी बंडखोरी केलेले राहुल कलाटे आपल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येत होते.

दोघेही थेरगाव येथील माध्यमिक विद्यालयासमोर आमने-सामने आले. त्यावेळी काटे व कलाटे यांना त्यांच्या त्त्यांच्या कार्यकर्त्यांनी उचलून घेतले. त्यावेळी दोनही बाजुंनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com