शरद पवारांच्या एका फोनची कमाल; कोरोना पॉझिटिव्ह महिला डॉक्टरला दिला धीर 

ncp president sharad pawar phone call to covid positive doctor
ncp president sharad pawar phone call to covid positive doctor

पिंपरी : रुग्णांची मनोभावे सेवा करत असताना डॉक्ट रही पॉझिटिव्ह होत आहेत. मात्र, डॉक्टारांवरही योग्य ते उपचार सुरु आहेत. सध्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये (वायसीएम) कोरोना उपचारासाठी दाखल असलेल्या डॉ. आरती उदगीरकर यांच्या प्रकृतीची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहानुभूतीपूर्वक विचारपूस केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

'सकाळ'मध्ये 'कोरोनाने हिरावली बहीण-भावांची भेट' या मथळ्याखाली बुधवारी (ता.5) वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी डॉ. आरती यांचे वडील नरसिंगराव उदगीरकर यांच्याशी संवाद साधून वायसीएम रुग्णालयातील डॉक्टपरांसोबत तिच्यावर सुरू असलेल्या उपचाराबद्दल जाणून घेतले. सध्या लातूर येथे असलेले आरतीचे वडील नरसिंहराव उदगीरकर यांच्याशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, 'वायसीएमच्या डॉक्टलरांसोबत माझे बोलणे झाले आहे. डॉ. आरती यांना विश्रांती घ्यावी लागेल. पुरेशा उपचारासाठी दोन ते तीन आठवडे लागतील. काळजी करण्याचे कारण नाही. धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड हे देखील उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत आणि 15 दिवसांनी कामालाही लागले. आरती यांच्यासाठी दवाखान्यात उत्तम औषधे व इंजेक्शतनची व्यवस्था आहे. आरतीच्या तब्बेतीमध्ये झालेली सुधारणाही डॉक्ट र मला कळवीत आहेत.'

डॉ. आरती म्हणाल्या, 'गेल्या 16 दिवसांपासून मी वायसीएम रुग्णालयात आहे. जराही कल्पना नव्हती की, एवढे ज्येष्ठ नेते फोन करून विचारणा करतील. बातमीचा विषय त्यांना जास्त भावला. रक्षाबंधन होतं आणि सर्वजण आनंदात होते. त्यामुळे सर्वांनी माझ्याकडे आस्थेने विचारपूस केली. शरद पवार यांच्या कॉलनंतर आयुक्त श्रवण हार्डिकर, अधिष्ठाता राजेंद्र वाबळे, कान-नाक-घसा तज्ज्ञ अनिकेत लाठी, डॉ. एम.एस.कराळे, डॉ. तुषार पाटील यांनीही विचारपूस करुन मनोबळ वाढविण्याचे काम केले. माझी काळजी करणाऱ्या सर्वांची मी ऋणी आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com