Corona Updates : पिंपरी-चिंचवड शहरात आज 108 नवीन रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 November 2020

  • शहरात मंगळवारी 108 रुग्ण आढळले.

पिंपरी : शहरात मंगळवारी 108 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 88 हजार 986 झाली आहे. आज 151 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 86 हजार 35 झाली आहे. सध्या एक हजार 400 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील चार व शहराबाहेरील दोन रुग्णांचा मृत्यू झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 551 आणि शहराबोहरील मृतांची संख्या 641 झाली आहे. शहरात सध्या बाहेरील 145 रुग्ण उपचार घेत आहेत. सध्या महापालिका रुग्णालयांत केवळ 732 रुग्ण उपचार घेत आहेत. 668 रुग्ण होम आयसोलेट आहेत. आजपर्यंत शहराबाहेरील सहा हजार 525 रुग्ण बरे झाले आहेत. शहरातील 56 रुग्ण सध्या शहराबाहेरील रूग्णालयात दाखल आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक पुरुष चिंचवड (वय 75), आकुर्डी (वय 41), निगडी (वय 64) आणि भोसरी (वय 66) येथील रहिवासी आहेत. आज मृत्यू झालेले शहराबाहेरील नागरिक पुरुष देहूगाव (वय 54) व शिरूर (वय 64) येथील रहिवासी आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 108 corona positive patients found in pimpri chinchwad on tuesday 10 november 2020

Tags
टॉपिकस
Topic Tags: