मावळात कोरोना रुग्ण वाढीचा सिलसिला कायम; आजचा आकडाही मोठा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जुलै 2020

तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या २३६ झाली आहे.

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या वाढीचा सिलसिला चालूच असून, सोमवारी साई येथे नऊ, तळेगाव येथे चार, तर वडगाव, बधलवाडी व भाजे येथे प्रत्येकी एक अशा प्रकारे एकूण १६ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या २३६ झाली आहे. त्यात शहरी भागातील ८५, तर ग्रामीण भागातील १५१ जणांचा समावेश आहे. 

Breaking : पिंपरी-चिंचवडकरांनो, लॉकडाउनचे हे नविन आदेश जाणून घ्या...

लॉकडाउन काळात पिंपरी-चिंचवडमध्ये काय सुरू, काय बंद? वाचा सविस्तर

तळेगाव येथे सर्वाधिक ६२, लोणावळा येथे १६ व वडगाव येथे सात अशी रुग्ण संख्या झाली आहे. आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून, ८५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या १०२ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. तर ४० जण गृहविलगीकरणात असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी डॉ.चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

साई येथील पाच पुरुष व चार महिलांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे सर्व जण अगोदर पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत. या सर्वांच्या नजीकच्या संपर्कातील ३२ जणांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. तळेगाव येथील एका ६५ वर्षीय पुरुषाचा, खासगी नोकरी करणाऱ्या एका  ४० वर्षीय व ४८ वर्षीय कामगारांचा व ६९ वर्षीय गृहिणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या सर्वांच्या नजीकच्या संपर्कातील तेरा जणांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. वडगाव येथील एका मोठ्या हाउसिंग सोसायटीमधील ४० वर्षीय पुरुषाचा, बधलवाडी येथील एका ६० वर्षीय व भाजे येथील एका ४९ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. भाजे येथील महिलेच्या  संपर्कातील तीन जणांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत.

Edited by : Shivnandan Baviskar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 16 people were found corona positive in maval taluka