मावळात आज कोरोनाबाधितांची संख्या घटली

ज्ञानेश्वर वाघमारे
Saturday, 15 August 2020

मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांच्या तुलनेत शनिवारी (ता. 15) कोरोना रुग्णांची संख्या घटली.

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांच्या तुलनेत शनिवारी (ता. 15) कोरोना रुग्णांची संख्या घटली. दिवसभरात २० जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले, तर कोरोनाबाधित दोघांचा मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे येथील ७९ वर्षीय व वराळे येथील ३७ वर्षीय पुरुषाचा मृतांमध्ये समावेश आहे. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या एक हजार ३६२ व मृतांची संख्या ५१ झाली आहे. ८९३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या २० जणांमध्ये कामशेत येथील पाच, तळेगाव दाभाडे, वडगाव व वराळे येथील प्रत्येकी तीन, कान्हे येथील दोन; तर लोणावळा, कुसगाव बुद्रुक व साते येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या एक हजार ३६२ झाली असून, त्यात शहरी भागातील ६८७ व ग्रामीण भागातील ६७५ जणांचा समावेश आहे. तळेगाव येथे सर्वाधिक ४४०, लोणावळा येथे १४६, तर वडगाव येथील रुग्ण संख्या १०१ झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत ५१ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे ८९३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शनिवारी १९ जणांना घरी सोडण्यात आले. तालुक्यात सध्या ४१७ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील २७७ जण लक्षणे असलेले, तर १४० जण लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या २७७ जणांपैकी १९० जणांमध्ये सौम्य व ६८ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. १९ जण गंभीर आहेत. सध्या ४१२ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरू असून, पाच जण गृहविलगीकरणात असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.

Edited by Shivnandan Baviskar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 20 corona patients found in maval on saturday 15 august 2020