मावळात दिवसभरात २४ नवे पॉझिटिव्ह, तर चौघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 August 2020

मावळ तालुक्यात सोमवारी दिवसभरात २४ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले, तर कोरोनाबाधित चौघांचा मृत्यू झाला.

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात सोमवारी दिवसभरात २४ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले, तर कोरोनाबाधित चौघांचा मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे येथील ७८ वर्षीय, ६० वर्षीय, ७५ वर्षीय आणि लोणावळा (रामनगर) येथील ७२ वर्षीय पुरुषाचा मृतांमध्ये समावेश आहे. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या एक हजार ७३१, तर मृतांची संख्या ६९ झाली आहे. आतापर्यंत एक हजार ३१० जणांनी कोरोनावर मात केली आहे. तालुक्यात एकूण रुग्णांपैकी ७५ टक्के जण बरे झाले आहेत. मृत्यूचे प्रमाण मात्र, शेकडा ३.९ आहे.

पवना धरणसाठ्यात 17 टक्‍क्‍यांनी वाढ; धरण किती टक्के भरले वाचा

सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या २४ जणांमध्ये तळेगाव दाभाडे व लोणावळा येथील प्रत्येकी आठ, कामशेत येथील चार; तर टाकवे बुद्रुक, वराळे, गहुंजे व शिलाटणे येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या एक हजार ७३१ झाली असून, त्यात शहरी भागातील ८९६ तर ग्रामीण भागातील ८३५ जणांचा समावेश आहे. तळेगाव येथे सर्वाधिक ५७४, लोणावळा येथे २०२ तर वडगाव येथील रुग्ण संख्या १२० झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत ६९ जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे एक हजार ३१० जणांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारी ५२ जणांना घरी सोडण्यात आले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तालुक्यात सध्या ३५२ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील २३७ जण लक्षणे असलेले व ११५ जण लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या २३७ जणांपैकी १४८ जणांमध्ये सौम्य, तर ७२ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. १७ जण गंभीर आहेत. सध्या ३५२ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली. दरम्यान, तालुक्यात मृतांची संख्या वाढत असून मृतांमध्ये वृद्ध व गंभीर आजार असलेल्या व्यक्तींचा समावेश असल्याने अशा व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन डॉ. लोहारे यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 24 corona positive in maval on monday 24 august 2020