esakal | मावळात दिवसभरात ३३ पॉझिटिव्ह, तर दोघांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

मावळात दिवसभरात ३३ पॉझिटिव्ह, तर दोघांचा मृत्यू

मावळ तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची व मृतांची संख्या वाढतच चालली आहे.

मावळात दिवसभरात ३३ पॉझिटिव्ह, तर दोघांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची व मृतांची संख्या वाढतच चालली आहे. मंगळवारी दिवसभरात ३३ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले, तर कोरोनाबाधित दोघांचा मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे येथील ६० वर्षीय व सोमाटणे येथील ५१ वर्षीय पुरुषांचा मृतांमध्ये समावेश आहे. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या दोन हजार ३४, तर मृतांची संख्या ८२ झाली आहे. एक हजार ४१८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून आज पुन्हा मृतांचा आकडा चुकला 

मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या ३३ जणांमध्ये तळेगाव दाभाडे येथील सर्वाधिक १४, लोणावळा येथील आठ, कामशेत येथील चार, कुसगाव बुद्रुक येथील दोन; तर वडगाव, निगडे, कांब्रे नामा, नाणे व वेहेरगाव येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दोन हजार ३४ झाली असून, त्यात शहरी भागातील एक हजार ९१ आणि ग्रामीण भागातील ९४३ जणांचा समावेश आहे. 

आमदार सुनील शेळके म्हणतायेत, 'धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय जलपूजन नाही'

तळेगावात सर्वाधिक ७०३, लोणावळा येथे २५५, तर वडगाव येथे रुग्णसंख्या १३३ एवढी झाली आहे. आतापर्यंत ८२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजार ४१८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी नऊ जणांना घरी सोडण्यात आले. सध्या तालुक्यात ५३४ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील ३३९ जण लक्षणे असलेले, तर १९५ जण लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या ३३९ जणांपैकी २३९ जणांमध्ये सौम्य, तर ८३ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. १७ जण गंभीर आहेत. सध्या ५३४ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.

loading image