esakal | Corona Updates : पिंपरी-चिंचवडमध्ये आज 561 नवे पॉझिटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Updates : पिंपरी-चिंचवडमध्ये आज 561 नवे पॉझिटिव्ह 

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या 713 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला.

Corona Updates : पिंपरी-चिंचवडमध्ये आज 561 नवे पॉझिटिव्ह 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील विविध रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या 713 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला. 561 नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णांची संख्या 82 हजार 503 झाली आहे. आजपर्यंत 76 हजार 763 रुग्ण बरे झाले आहेत. 

ड्रग्ज विक्रीप्रकरणी चाकणमध्ये पकडलेल्या आरोपींचा विमान प्रवास; मुंबई कनेक्शनची शक्यता

पिंपरी-चिंचवड शहरात सध्या पाच हजार 335 सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील दोन हजार 761 रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयांत उपचार घेत आहेत. आज शहरातील नऊ आणि शहराबाहेरील पाच, अशा 14 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 405 आणि शहराबोहरील मृतांची संख्या 542 झाली आहे. 

नॉन कोविड रुग्णांसाठी उपलब्ध होणार 50 टक्के बेड; पिंपरी-चिंचवड महापालिकेचा निर्णय  

आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक पुरुष चिंचवड (वय 66), काळेवाडी (वय 66), निगडी (वय 53), पिंपळे सौदागर (वय 63), वाकड (वय 89), दिघी (वय 72), पिंपळे गुरव (वय 67) आणि महिला चिंचवड (वय 64), पिंपरी (वय 43) येथील रहिवासी आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आज मृत्यू झालेले शहराबाहेरील नागरिक पुरुष सातारा (वय 73), कुरकुंडी (वय 45), खेड (वय 54) आणि महिला पुणे (वय 52) व पंढरपूर (वय 69) येथील रहिवासी आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेअंतर्गत शहरात घरोघरी सर्वेक्षण सुरू आहे. त्यासाठी एक हजार 314 पथके नियुक्त केली आहेत. एका पथकात तीन जणांचा समावेश आहे. आजपर्यंत 22 लाख 60 हजार 946 जणांची तपासणी करण्यात आली. त्यात दोन हजार 342 जण संशयित आढळले. त्यांच्या घशातील द्रावांची तपासणी केली असता 562 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले.