पिंपरी-चिंचवड शहरात आज 792 नवे पॉझिटिव्ह; रुग्णांचा एकूण आकडा पाहा

पिंपरी-चिंचवड शहरात आज 792 नवे पॉझिटिव्ह; रुग्णांचा एकूण आकडा पाहा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आज 792 नवीन रुग्ण आढळले. यामुळे एकूण रुग्ण संख्या 30 हजार 619 झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 590 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 14 जणांचा मृत्यू झाला.

आजपर्यंत शहरातील 21,798 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 510 जणांचा आजपर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या 8391 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आज निगडी (पुरुष 73 वर्षे), भोसरी (स्त्री 80 वर्षे), दिघी (पुरुष 24 वर्षे, पुरुष 52 वर्षे), पिंपरी (पुरुष 63 वर्षे), दापोडी (पुरुष 80 वर्षे), मोरवाडी (पुरुष 70 वर्षे), वाकड (पुरुष 60 वर्षे), चिंचवड (पुरुष 47 वर्षे), पिंपळेनिलख (स्त्री 80 वर्षे), पुनावळे (पुरुष 34 वर्षे) तसेच, पुणे पालिका हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण निगडी (स्त्री 55 वर्षे), भोसरी (स्त्री 40 वर्षे, स्त्री 54 वर्षे) येथील रुग्णांचा मृत्यू झाला.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com