Pimpri News : 'हा माझा एरिया' म्हणत पोलिसाला धक्काबुक्की | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pimpri News

Pimpri News : 'हा माझा एरिया' म्हणत पोलिसाला धक्काबुक्की

पिंपरी : पोलिसाची कॉलर पकडून शिवीगाळ करीत धक्काबुक्की केल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना निगडीतील साईनाथ नगर येथे घडली.अतुल अरुण कांबळे (वय ३४, रा. पवळ परिश्रम हौसिंग सोसायटी, यमुनानगर, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा: विजयी संघातील खेळाडूला पिंपरीत बॅटने बेदम मारहाण

याप्रकरणी सचिन विश्वास मोरे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे गुन्हे शाखा युनिट एकमध्ये पोलिस शिपाई पदावर कार्यरत आहेत. बुधवारी (ता. १०) मध्यरात्री बाराच्या सुमारास ते साईनाथनगर येथे आरोपीचा शोध घेत असताना नशेत असलेला आरोपी त्यांच्याजवळ आला.

हेही वाचा: पिंपरी : वकीलाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

'तुम्ही येथे काय करताय? हा माझा एरिया' असे म्हणाला. त्यावर फिर्यादीने त्याला ओळखपत्र दाखवले. तरीही आरोपीने त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. फिर्यादीची कॉलर पकडून त्यांच्यावर हात उचलत धक्काबुक्की केली. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

loading image
go to top