पिंपरी : आनंदनगरचे रहिवासी बरे होताहेत; आज बघा किती जण घरी परतले

पिंपरी : आनंदनगरचे रहिवासी बरे होताहेत; आज बघा किती जण घरी परतले

पिंपरी : गेल्या पंधरा दिवसांपासून पिंपरी-चिंचवडसह पुणे शहर प्रशासनाचे लक्ष चिंचवड स्टेशन परिसरातील आनंदनगरने वेधून घेतले होते. अवघ्या काही दिवसांत येथील कोरोना संसर्ग झालेल्या नागरिकांची संख्या झपाट्याने वाढली. शिवाय सोशल डिस्टन्सिंग, मास्क न वापरणे, रस्ते बंद करण्यासाठी वापरलेले पत्रे उचकटून बाहेर फिरणे, पोलिसांना न जुमानने अशा विविध प्रकारांमुळे ही झोपडपट्टी चर्चेत आली. परंतु, प्रशासनाने केलेले प्रबोधन, जनजागृती, अन्नधान्याची केलेली व्यवस्था, स्वत: वस्तीत येऊन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिलेला विश्वास, यामुळे आनंदनगरमधील रहिवासी ऐकू लागले. स्वत:हून तपासणीसाठी येऊ लागले. त्यामुळे अधिकाधिक व्यक्तींची तपासणी होऊन संसर्ग झालेल्यांवर वेळेवर उपचार सुरू झाले. 

निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्यांनी सूचनांचे पालन सुरू केले. असे दिलासादायक चित्र आता आनंदनगरमध्ये दिसू लागले आहे. यात आणखी दिलासादायक बाबींची भर पडली.‌ ती म्हणजे गेल्या दोन दिवसांत येथील नऊ जण ठणठणित बरे होऊन घरी गेले आहेत. पण, चौदा दिवस घरातच राहण्याची सूचना त्यांना केली आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आनंदनगरमध्ये पहिला रुग्ण तेरा मे रोजी आढळला. अर्थात या दिवशी त्याचा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीकडील तपासणीचा रिपोर्ट आला होता. त्यापूर्वी एक दिवस अगोदरच ही व्यक्ती रुग्णालयात दाखल झाली होती. ती आता घरी आली आहे. गेल्या पंधरा दिवसांत पावणे दोनशेच्या आसपास येथील रुग्ण आढळले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आजही येथील तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्यासह शहरातील 20 नवीन रुग्ण आढळले आहेत. हे सर्व जण आनंदनगर चिंचवड, बजाज ऑटो कॉलनी, बौध्दनगर पिंपरी, थेरगाव, किवळे येथील रहिवासी आहेत. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णांची संख्या 471 झाली आहे. आजपर्यंत 211 जणांना घरी सोडण्यात आले असून सध्या 253 जणांवर उपचार सुरू आहेत. आज आनंदनगरमधील सहा जणांना घरी सोडण्यात आले. तसेच, आज एका व्यक्तीचा मृत्यू झाला ते पुण्यातील गोखलेनगरमधील रहिवासी होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com