पिंपरीत उद्या सायंकाळी पाणीपुरवठा बंद

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 February 2021

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीचे कामे करण्यासाठी गुरुवारी (ता. 4) यंत्रणा बंद ठेवणार आहेत.

पिंपरी - पिंपरीत जलउपसा केंद्रात दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारीत 4 फेब्रुवारी रोजी शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवला जाईल. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीचे कामे करण्यासाठी गुरुवारी (ता. 4) यंत्रणा बंद ठेवणार आहेत.

पुण्यात डेटींग अॅपवरून ओळख;आईची औषधे वापरून 16 तरुणांना लुटले

याबाबत मिळालेली माहिती अशी की, निगडी (सेक्‍टर क्र. 23) येथील जलशुद्धीकरण केंद्रातील वीजपुरवठा व पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्‍यक कामे करण्यात येणार आहेत. पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्‍यक असल्याने गुरुवारी शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचदिवशी सकाळी पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. 

भाजप नगरसेविकेच्या पतीवर चोरी प्रकरणी गुन्हा

दुरुस्तीच्या कामासाठी सर्व यंत्रणा बंद ठेवल्यामुळे शहरातील सर्व भागात दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. 5) सकाळचा पाणीपुरवठा अनियमित होण्याची शक्‍यता आहे, तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करावा. तसंच पाणी काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेने केलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no water supply on thursday in pimpri chinchwad

Tags
टॉपिकस
Topic Tags: