राज्य सरकारचे नियम धाब्यावर, शाळांकडून ‘व्याजाचा व्यवसाय’

इंग्रजी शाळांकडे पालकांचा ओढा दिवसागणिक वाढत चालल्यामुळे छोट्या-मोठ्या शिक्षणसम्राटांनी राज्य सरकारचे नियम धाब्यावर बसवून, इंग्रजी शाळांचा व्यवसाय सुरू केला आहे.
school fees
school feessakal
Summary

इंग्रजी शाळांकडे पालकांचा ओढा दिवसागणिक वाढत चालल्यामुळे छोट्या-मोठ्या शिक्षणसम्राटांनी राज्य सरकारचे नियम धाब्यावर बसवून, इंग्रजी शाळांचा व्यवसाय सुरू केला आहे.

पिंपरी - इंग्रजी शाळांकडे पालकांचा ओढा दिवसागणिक वाढत चालल्यामुळे छोट्या-मोठ्या शिक्षणसम्राटांनी राज्य सरकारचे नियम धाब्यावर बसवून, इंग्रजी शाळांचा व्यवसाय सुरू केला आहे. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच शुल्काचा पहिला हप्ता चुकताच पालकांच्या काळजाचा ठोका चुकत आहे. कारण प्रत्येक शाळेत शुल्क भरण्यास विलंब झाल्यावर दिवसाला दहा ते ५० रुपये दंड आकारला जात आहे. अक्षरशः या शाळांनी व्याजाचा व्यवसाय सुरू केला आहे का, असा प्रश्‍न पालकांना सतावत आहे.

विक्रीकर आणि प्राप्तीकराप्रमाणेच मुद्रांक शुल्क भरण्यास उशीर झाला तर संबंधित सरकारी विभाग विलंब शुल्कही आकारतो. त्याची पावती तरी मिळते, पण शाळामध्ये विलंब शुल्क भरण्याबाबतचे नियम ऐकिवात नाहीत. परंतु सर्वाधिक लूटमार ही प्रामुख्याने सीबीएसई इंग्रजी शाळांकडून होत आहे, ‘यू डायस’च्या आकडेवारीनुसार शहरात ६५५ मराठी आणि सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू आहेत. शहरात काही शाळा शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना वेगळी वागणूक देतात. काहींचे निकाल राखून ठेवले जातात तर काहींना ऑनलाइन वर्गांना बसू दिले जात नसल्याचे प्रकार पुढे आले होते. काही शाळांमध्ये असे प्रकार होत असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत.

शिक्षण शुल्काच्या मुद्द्यावरून पालक आणि शाळा प्रशासन यांच्यात अनेकवेळा जोरदार खडाजंगी होते. कोरोनात अनेक पालकांनी नोकरी गमावल्यामुळे मुलांचे शुल्क ते वेळेवर भरू शकले नाहीत. दरम्यान, प्रत्येक शाळेचा वेगळा नियम आहे. दिवसागणिक १०, २० आणि ५० रुपयांपर्यंत विलंब शुल्क दंड आकारत होते. शाळेने दिलेल्या चलनानुसार (उदाहरणार्थ १५०००, २००००) भरायला लागत आहे. ते शुल्क त्या तारखेला न भरल्यास दिवसागणिक दंड आकारला जात आहे. पान ३ वर

शिक्षणमंत्र्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष

कोरोनाकाळातल्या शुल्काचा वाद टोकाला पोचल्यावर शिक्षण शुल्कासंदर्भात शाळा, पालकांनी समन्वयाने निर्णय घेणेच योग्य आहे. शुल्क न भरल्याने एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, अशा शाळांना सक्त सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत. पुण्यात पालकांनी गायकवाड यांना घेरावो घातला होता. पालक चांगलेच आक्रमक झाले होते. त्यावर गायकवाड यांनीदेखील विलंब शुल्क आकारणाऱ्या शाळांवर थेट कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. प्रत्यक्षात एकाही शाळेवर कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com