पिंपरी-चिंचवडमधील औषध विक्रेत्यांना मिळणार थेट डिलिव्हरी

पिंपरी-चिंचवडमधील औषध विक्रेत्यांना मिळणार थेट डिलिव्हरी

पिंपरी : पुण्यातील सदाशिव पेठेतल्या औषधांच्या होलसेल बाजारपेठेत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर शहरातील औषध व्यापारी सजग झाले आहेत. मंगळवारपासून (ता. 19) शहरातील औषध दुकानदारांना थेट दुकानात डिलिव्हरी देण्यात येणार आहे. सुरुवातीला भोसरी आणि सांगवी परिसरातील दुकानांपासून त्याची सुरुवात होणार असून, आठवड्याच्या अखेरपर्यंत शहरातील सर्व औषध दुकांनाना हे व्यापारी डिलिव्हरीद्‌वारेच त्याचा पुरवठा करणार आहेत. पुढील सोमवारपासून (ता. 25) चिंचवडमधील होलसेल औषध बाजारपेठेमध्ये त्याठिकाणचे दुकानदार आणि त्यांचा कर्मचारी वगळता अन्य कुणालाही प्रवेश देण्यात येणार नसल्याचे पिंपरी-चिंचवड केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष खिंवसरा यांनी सांगितले. 

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे त्यासंदर्भात औषध दुकानदारांना कशा प्रकारे डिलिव्हरी द्यायची, दुकानात कोणती काळजी घ्यायची, याची माहिती या भागातील दुकानदारांना देण्यात आली. शहरात 1800 औषधांची दुकाने आहेत. त्यामुळे या सर्वांसाठी एकाच दिवशी डिलिव्हरी देण्याची सुविधा सुरू करणे शक्‍य नाही. त्यामुळे या विक्रेत्यांनी शहरातील सर्व भागांमध्ये टप्याटप्याने त्याची सुरुवात करण्याचे नियोजन केले आहे. सुरुवातीला भोसरी, सांगवीमधे सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानंतर चिंचवड, पिंपरी, आकुर्डी, वाकड, पिंपळे गुरव, सौदागर, रहाटणी, आदी भागांमध्ये त्याची सुरुवात होणार आहे.

आठवडा अखेरपर्यंत शहरातील संपूर्ण परिसरातील दुकानांना थेट डिलिव्हरी मिळणार आहे. त्यामुळे घाउक बाजारपेठेत होणारी गर्दी कमी होणार आहे. दरम्यान, औषध दुकानदारांना डिलिव्हरी देताना पाठवण्यात येणाऱ्या डिलिव्हरी बॉइजच्या सुरक्षिततेची खबरदारी घेण्यात आली आहे. मास्कचा वापर, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन त्यांच्याकडून करण्यात येणार असल्याचे खिंवसरा यांनी सांगितले. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपल्या दुकानांमध्ये खबरदारी घेण्याच्या सूचना...
औषध व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांमध्ये देखील योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रेड झोनमधील कर्मचाऱ्यांना सुटी देण्यात यावी. कामाच्या ठिकाणी मास्क, सॅनिटायझर याचा वापर करण्यात यावा. प्रत्येकाने दुकानात सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्‍यक आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com