पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांनी गाठला आज पाच हजारांचा टप्पा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जुलै 2020

- मंगळवारी दिवसभरात 342 रुग्ण वाढले, तर 232 जणांना डिस्चार्ज मिळाला
- आज दिवसभरात पाच जणांचा मृत्यू

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील पाच जणांचा मंगळवारी (ता. 7) दिवसभरात कोरोनामुळे मृत्यू झाला. तर, एकूण बाधितांची संख्या पाच हजार 342 झाली आहे. तसेच, शहराबाहेरील रहिवासी मात्र, शहरातील विविध रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या दहाने वाढली आहे. आज दिवसभरात 232 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

सध्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, बीजे मेडिकल कॉलेज, राष्ट्रीय एड्स निर्मूलन व संशोधन संस्था अर्थात नारी आणि महापालिकेचे वायसीएम रुग्णालय यांच्यासह खासगी सहा लॅबमध्ये कोरोना संशयितांचे स्वॅब तपासणी केली जात आहे. त्यामुळे अधिक प्रमाणात व लवकर रुग्ण शोधले जाऊ लागले आहेत. दररोज सरासरी एक हजार स्वॅब तपासणी केली जात असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

हेही वाचा- Video : कोरोनाचा कहर तरी, शरद पवारांनी कार्यकर्त्याला श्रद्धांजली द्यायला गाठलं त्याचं घर, वाचा सविस्तर

कोरोनाची लक्षणे असलेले 1360 संशयित रुग्ण आज दिवसभरात रुग्णालयात दाखल झाले आहेत. 1937 जणांचे तपासणी अहवाल प्रतीक्षेत आहेत. सध्या 1968 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत शहरातील मृतांची संख्या 72 झाली आहे. आज पाच जणांचा मृत्यू झाला. 

हेही वाचा- 'या' कार्यकर्त्याची श्रद्धा पाहून शरद पवारही झाले नि:शब्द!

आज मृत झालेले रुग्ण बौद्धनगर पिंपरी (पुरुष, वय- ६४ वर्षे), शरदनगर- चिखली (पुरुष, वय-८५ वर्षे), चिंचवड (पुरुष , वय- ८४ वर्षे), सुखवाणी- पिंपरी (पुरुष,वय- ६७ वर्षे) येथील रहिवाशी आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, पावसाळा सुरु झालेला असल्याने वैद्यकीय विभाग, पिं. चिं. मनपामार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाचे पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही, याची काळजी घ्यावी व सोबत किमान एक तरी अतिरीक्त (Extra) मास्क ठेवावा.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of patients in Pimpri-Chinchwad city is 5203