लोणावळा : नौदल प्रशिक्षण केंद्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढली

लोणावळा : नौदल प्रशिक्षण केंद्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढली

लोणावळा : लोणावळ्यातील नौदल प्रशिक्षण केंद्र असलेल्या आयएनएस शिवाजीतील आणखी एक प्रशिक्षणार्थी जवान कोरोनाबाधित आढळला आहे. शनिवारी (ता. २०) तिघा वीस वर्षीय प्रशिक्षणार्थी जवानांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. रविवारी आणखी एका वीस वर्षीय जवानाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. 

मूळ उत्तर प्रदेश येथील असलेला कोरोनाबाधित जवान प्रशिक्षणासाठी बुधवार (ता. ३) जून रोजी आयएनएस शिवाजी कॅम्पसमध्ये दाखल झाले होते. दरम्यान त्यांना कॅम्पस मधेच क्वारंटाईन करण्यात आले होते. सदर  जवानास गुरूवारी (ता. १८) कोरोनाची  लक्षणे जाणवू लागल्याने त्यास पुण्यातील लष्करी रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले होते. रविवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

---------------

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com