कामशेतमध्ये आढळला नवा पॉझिटिव्ह, आता रुग्ण संख्या झाली...

सकाळ वृ्त्तसेवा
शुक्रवार, 3 जुलै 2020

येथील दत्त कॉलनीतील पन्नास वर्षीय व्यक्तीस कोरोनाची लागण झाली आहे.

कामशेत (ता. मावळ) : येथील दत्त कॉलनीतील पन्नास वर्षीय व्यक्तीस कोरोनाची लागण झाली आहे. या व्यक्तीस कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. शुक्रवारी दुपारी दोनच्या या रुग्णाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समजले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

प्राथमिक आरोग्य केंद्र खडकाळे येथील अधिकारी डॉ. सुनील चिद्रावार यांच्यासह अन्य आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन  रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांना क्वारंटाइन केले. शहरातील एका नऊ महिन्याच्या चिमुकल्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. त्यानंतर आता दत्त कॉलनी मध्ये ५० वर्षीय व्यक्तीस देखील कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे कामशेतमधील कोरोना रुग्णांची संख्या दोन झाली आहे. शहराजवळील अहिरवडेत एकजण पॉझिटिव्ह होता. त्याने व शहरातील नऊ महिन्याच्या मुलींने कोरोनावर मात केली आहे.

हेही वाचा- Breaking : पिंपरी-चिंचवडमध्ये मृतांचा आकडा वाढला, आज झालेले मृत्यू आतापर्यंतचे सर्वाधिक

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One corona positive at Kamshet